Illegal Fetal Diagnosis And Abortion Racket:  Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar: गर्भातच कळ्या खुडायचे, शेतात पुरायचे, छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंगनिदान करणारे रॅकेट उध्वस्त; १० अटकेत

Illegal Fetal Diagnosis And Abortion Racket: पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी आणि तिची आई गर्भलिंग निदान करत असल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आले होते. याप्रकरणी आता नवीन खुलासा झाला असून डॉक्टरसह १० जणांना अटक करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर, ता. १८ मे २०२४

छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा येथील गर्भलिंग निदान सेंटरवर छापा मारून एका पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी आणि तिची आई गर्भलिंग निदान करत असल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आले होते. याप्रकरणी आता नवीन खुलासा झाला असून डॉक्टरसह १० जणांना अटक करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा येथील गर्भलिंग निदान सेंटरवर छापा मारला होता. या छापेमारीत 12 लाख 78 हजार पेक्षा अधिक रक्कम आणि इतर साहित्य मिळून आले होते. याप्रकरणी आता नवीन खुलासा झाला असून तपासणी गारखेड्यात आणि गर्भपात सिल्लोडमध्ये होत असल्याचे समोर आले आहे.

गर्भपात करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या टोळीचा पोलिसांनी आता पर्दाफाश केला असून 1 आयुर्वेदिक डॉक्टर सह 10 जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. रोशन ढाकरे असं या अवैधरित्या गर्भात करणाऱ्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

या टोळीने शहरातल्या गारखेड्यातील देवगिरी अपार्टमेंटमध्ये गर्भलिंग निदान करून थेट सिल्लोडमधल्या श्री हॉस्पिटलमध्ये शेकडो कळ्या गर्भातच खुल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून गर्भपात केलेले सर्व मृत अर्भक तो आसपासच्या शेतात पुरायचा. विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या महिलांना गर्भपात करायचा असेल तर बचत गट मीटिंगसाठी आले असा गर्भपातासाठी ठरलेला कोडवर्ड असायचा, असेही चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT