Crime News Saam Digital
क्राईम

Crime News: बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश.. ९ लाख रुपयांसह तब्बल १२ तोळे सोने लंपास; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Crime News: बाथरूमच्या खिडकीच्या काचा बाजूला करून चोरांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल 9 लाख 50 हजार रुपये रोख रकमेसह 12 तोळे सोने लंपास केल्याचे उघड झाले आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १८ एप्रिल २०२४

छत्रपती संभाजीनगरमधून चोरीची धक्कादायक घटन समोर आली आहे. बाथरूमच्या खिडकीच्या काचा बाजूला करून चोरांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून तब्बल 9 लाख 50 हजार रुपये रोख रकमेसह 12 तोळे सोने लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील एन वन परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरामध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात बाथरूमच्या खिडकीच्या काचा बाजूला करून चोरांनी तब्बल 9 लाख 50हजार रुपये रोख रकमेसह 12 तोळे सोने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोबतच चोरी नंतर पोलिसांना फुटेज हाती लागू नये म्हणून चोरांनी जाताना CCTV कॅमेरे देखील काढून नेल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, व्यापारी रामभाऊ किसन तांबे हे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मूळ गावी केले होते आणि 15 एप्रिल रोजी रात्री उशिरा ते कुटुंबासह घरी परतले. गेट उघडून मुख्य दरवाजा उघडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा व डीव्हीआर आढळून आला नसल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातअज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडच्या (Nanded) किनवट तालुक्यातील बोधडी गावातील एका सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. बोध डी येथील दत्ता शहाणे हे आपले दुकान बंद करून घराकडे जात होते. घराकडे जात असताना त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पूड टाकून त्यांच्या जवळील 7 लाख 58 हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 65 हजार रुपये चोरट्याने लंपास केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT