Crime News Saam tv
क्राईम

Crime News : बेपत्ता १६ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबियांचा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या, गंभीर आरोप!

Chhatrapati Sambhajinagar Crime News : पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Namdeo Kumbhar

रामू ढाकणे, साम टिव्ही प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : हिवरा मगळवार (ता.२४) १६ वर्षीय शाळकरी मुलगा बेपत्ता झाला होता. याविषयी त्याच्या वडिलाने करमाड पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. करण भाऊसाहेब पोफळे (वय१६) असे मुलाचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी (ता.२७) उघडकीस आली. आपल्या मुलाने एक पोलीस व शाळेतील शिक्षकाणे शाळेत त्याला मारहाण केली.त्याला अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप करीत मुलाच्या वडिलांनी व गावकरी यासह नातेवाईकांनी जालना मार्गावर जवळपास एक तास रस्ता रोको करीत मयत मुलाचा मृतदेहाची ॲम्ब्युलन्स पोलीस ठाण्याच्या गेटजवळ उभी केली. शेवटी पोलीस उपविभागीय अधिकारी विष्णू भोये यांनी चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाही करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह हिवरा येथे नेऊन रात्री उशीरा अंत्यसंस्कार केले.

शाळेतील मुलाच्या वडील भाऊसाहेब रंगनाथ पोफळे यांनी करमाड पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार ते २३ सप्टेंबर रोजी पत्नीसोबत करमाड येथे बाजार करण्यासाठी गेले होते. ते दोघे चार वाजता आपल्या हिवरा येथील घरी आले. यावेळी त्यांचा मुलगा करण हा शाळेतून घरी आला होता. जेवण केल्यानंतर त्यास सायंकाळी गायीसाठी गवत आणण्यासाठी शेतात पाठविले. परंतू बराच वेळ होऊनही तो घरी आलाच नाही. त्याचा शेतशिवारात, आजुबाजूंच्या गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला परंतू तो सापडला नाही. आपल्या मुलाचे कुणीतरी अपहरण केले आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शोधकार्य सुरू केले होते.

नातेवाईक करण शोध घेत असताना शूक्रवार (ता.२७) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हिवरा शिवारातील गट नंबर २८ मधील शेतात करणचा मृतदेह लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेला मिळून आला. यावेळी नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी करणला तपासून मयत घोषित केले होते. कारणचे वडील भाऊसाहेब रंगनाथ पोफळे हे हिवरा येथील अल्पभूधारक शेतकरी असून, शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.तर करणची आई देखील भाजीपाला विकून शेतीकाम करते अशा मेहनती शेतकऱ्याचा एकुलता एक मुलाने अशा प्रकारे कृत्य केल्याने संपूर्ण हिवरा गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आली .आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. करणच्या पार्थिवावर हिवरा येथे उशिरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

जालना मार्गावर एक तास वाहतूक ठप्प

जालना मार्गावर अचानक हजारो लोकांचा जनसमुदाय जमा झाल्याने एक तास मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुलाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संबंधितावर कारवाही करण्याची घोषणा करून पोलीस ठाण्याच्या गेटवर ॲम्ब्युलन्स उभी करण्यात आली होती. त्यामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेला वेगळे वळण मिळू नये यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून अतिरिक्त पोलिस फौज फाटा बोलवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT