Ghati Hospital CCTV Video Saam TV
क्राईम

CCTV Video: दोन गट भिडले, डॉक्टरच्या डोक्यात रॉडने वार; घाटी रुग्णालयातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Ghati Hospital CCTV Video: महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयातच उपचार सुरू आहे. घडलेली संपूर्ण घटना रुग्णालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Ruchika Jadhav

रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar:

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेत अससलेल्या दोन गटांत जोरदार राडा झाला आहे. तरुणांचे दोन गट आपआपसात भिडले आणि जोरदार हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत एका महिला निवासी डॉक्टरला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घाटी रुग्णालयातील अपघात विभागात गुरुवारी रात्री ही घटना घडली. उपचार घेत असलेल्या दोन गटांमध्ये अचानक एका शुल्लक कारणावरून वाद सुरु झाला. रुग्णालयातील या पेशंटमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत बदललं. यावेळी दोन्ही गट एकमेकांना हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण करत होते.

घटना घडली त्यावेळी तेथे एक महिला निवासी डॉक्टर देखील उपस्थित होत्या. या हाणामारीत एका तरुणाच्या हातातला रॉड डॉक्टरांच्या डोक्याला लागला. यामध्ये महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयातच उपचार सुरू आहे. घडलेली संपूर्ण घटना रुग्णालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाला लाडकीला ओवाळणी मिळणार! २९८४ कोटींचा निधी वर्ग, खात्यात ₹३००० खटाखट येणार?

अर्धा लिंबू, कुंकू अन् टाचण्या.. अजित पवार गटातील नेत्याच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

Maharashtra Monsoon Update : मुंबईत पावसाची दांडी, विदर्भात आज विजांच्या कडकटासह तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कणकवली रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ आला समोर

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

SCROLL FOR NEXT