10th Board Exam Saam Tv
क्राईम

10th Board Exam: अवघ्या १० मिनिटातच फुटला दहावीचा पेपर; प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

Rohini Gudaghe

संजय राठोड

Cheating In 10th Board Exam Yavatmal

राज्यात १ मार्चपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक नाशिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला (10th Board Exam) सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अवघ्या १० मिनिटातच पेपर फुटल्याची (Cheating In 10th Board Exam) घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ ( Yavatmal) जिल्ह्यातील पाटनबोरी येथे घडला आहे. (Latest Crime News)

यवतमाळ जिल्ह्यातील पाटनबोरी ( Patanbori) येथे दहावीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल (10th Question Paper) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका व्हाट्सअॅपवर व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पेपर सोशल मिडीयावर व्हायरल

बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या मराठी विषयाचा पहिलाच पेपर यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर अवघ्या दहा मिनिटातच (10th Question Paper Viral On WhatsApp) फुटला. याची माहिती मिळताच भरारी पथकाने केंद्र गाठून उपस्थितांची जबाब घेतला आहे.

त्यानंतर पांढरकवडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दहावीची परिक्षा कॉपीमुक्त व्हावी, ह्या दृष्टीने विविध पथके गठीत केली होती. त्याचप्रमाणे पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीसुद्धा पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर अवघ्या दहा मिनिटांत पेपर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याची घटना घडली (Cheating In 10th Exam Yavatmal) आहे.

पोलिसांत तक्रार नोंदवली

याची माहिती मिळताच पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी विकास मुळे यांनी पाच कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिक्षा केंद्र गाठले. केंद्रावरील पर्यवेक्षक, शालेय कर्मचारी, लिपीक, चपराशी आदींचे जबानी घेण्यात आली ( Yavatmal News) आहे. तद्नंतर पोलिसांत तक्रार नोंदविण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.

राज्यात ५ हजार ८६ केंद्रावर दहावीची परीक्षा पार पडत आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई (SSC Board Exam 2024) केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT