SSC Board Exams: दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ; विद्यार्थ्यांना पेपरसाठी १० मिनिटे वाढवून मिळणार

SSC Board Exam 2024: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
SSC Board Exams 2024
SSC Board Exams 2024Saam TV
Published On

Maharashtra Board SSC Time Table 2024

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तब्बल ३२ हजार १८९ विद्यार्थ्यी दहावीची परीक्षा देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. विद्यार्थ्यांनी अर्ध्या तासापूर्वी केंद्रावर हजर राहायचे आहे, असंही गोसावी यांनी सांगितलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

SSC Board Exams 2024
Gas Cylinder Price: मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, वाचा नवे दर...

राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Board Exams) एकूण ५ हजार ८६ मुख्य केंद्र आहेत. या केंद्रावर नजर ठेवण्यासाठी महसूल, ग्रामविकास, पोलीस दल आणि जिल्हाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर पथके नेमली आहेत.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनोळखी व्यक्ती घुसू नये तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पथकांमधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. याशिवाय कॉफ्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी ४०० भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बोर्डाने परीक्षेच्या कालावधीत १० मिनिटांची वाढ केली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरू केली आहे. मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांना ०२०-२५७०५२७१, ०२०-२५७०५२७२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर जाणं बंधनकारक आहे.

  • गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेसाठी १० मिनिटं विद्यार्थ्यांना जास्तीचे मिळणार आहेत.

  • परीक्षेत कुठलाही गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात होणार आहे.

  • कॉफ्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक असणार आहे.

  • विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.

SSC Board Exams 2024
Rain Alert: मुंबई-पुण्यासह 'या' भागांना आज मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com