Amravati Crime Saam TV
क्राईम

Amravati Crime: खळबळजनक! कारागृहात सापडला गांजाने भरलेला चेंडू; दोन महिन्यांतील चौथी घटना

Crime News: पोलीस शिपाई कारागृहात बॅरेक क्रमांक पंधरा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्या भागात काळ्या टेप पट्टीने गुंडाळलेला एक चेंडू आढळून आला. त्यांनी तो चेंडू कारागृह अधीक्षक यांच्याकडे दिला.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News:

अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा एकदा गांजाने भरलेला एक चेंडू आढळून आला आहे. या प्रकरणी कारागृहातील पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून नजीक असलेल्या फेजलरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमरावती मध्यगृह कारागृहातील गेल्या दोन महिन्यातील ही चौथी घटना ठरली आहे. एक फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई कारागृहात बॅरेक क्रमांक पंधरा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्या भागात काळ्या टेप पट्टीने गुंडाळलेला एक चेंडू आढळून आला. त्यांनी तो चेंडू कारागृह अधीक्षक यांच्याकडे दिला.

चेंडूची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये दहा ग्रॅम गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी तो गांगायुक्त चेंडू जप्त केला असून फेजरपुरा पोलिसांनी अज्ञानाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारागृहाला भेट दिली. आता हा गांजाने भरलेला चेंडू आला कुठून याचा शोध आता पोलीस घेत आहे.

या आधी १३ डिसेंबर रोजी देखील अमली पदार्थांप्रकरणी कारवाईची मोठी घटना बुलढाण्यातून समोर आली होती. बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईकरत ट्रॅक्टर भरून गांजा जप्त केला होता. लोणार तालुक्यातील हत्ता येथील एका शिवारात मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धाड टाकत १ कोटी ४० लाख किंमतीचा १४ क्विंटल गांजा जप्त केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली, पाय घसरला अन्.. ऐन दिवाळीत महिलेचा बुडून मृत्यू; पुण्यात खळबळ

Crime News : दारूसाठी पैसे दिले नाहीत, शेजारी संतापला, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

Maharashtra Politics: दिवाळीत ठाकरेंनी बॉम्ब फोडला, नाशिकमध्ये भाजपला धक्का; २ दिग्गज नेते 'मशाल' पेटवणार

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT