Crime news Saam Tv
क्राईम

Shocking : हातात लोखंडी दांडके, अंगावर रेनकोट, मध्यरात्री वावर; अंबरनाथकरांमध्ये 2 तरुणांची दहशत

Ambernath News : अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केटमध्ये पहाटे दोन संशयित चोरटे दांडके आणि टॉर्चसह फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • अंबरनाथ पश्चिमेत नेताजी मार्केट परिसरात दोन संशयित व्यक्ती फिरताना आढळले.

  • हातात दांडके व टॉर्च घेऊन हे चोरटे रेनकोट घालून वावरताना आढळले

  • सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.

  • पोलिस तपास सुरू; स्थानिकांकडून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी.

अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी दोन संशयित व्यक्ती फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा प्रकार मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडला.

बैठ्या वस्तीत हातात लाकडी व लोखंडी दांडके घेतलेले, अंगावर रेनकोट घातलेले हे दोघे चोरटे बिनधास्त फिरताना दिसले. त्यांच्या हातात टॉर्च होता आणि परिसरात ते टॉर्चच्या उजेडात शोधाशोध करत होते. या दरम्यान परिसरातील एका रहिवाशी पहाटे लवकर गेल्यास चोरट्यांनी त्याला हटकल्याचं त्याने सांगितलं. मात्र पकडलं जाण्याची भीती वाटताच हे चोरटे तिथून पळून गेले.

त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता? ते फक्त रात्रभर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या अविर्भावात लोकांना दिशाभूल करण्यासाठी फिरत होते का? की प्रत्यक्षात चोरी करण्याचा डाव होता? असा प्रश्न आता स्थानिकांमध्ये चर्चेत आला आहे.चड्डी बॉडी गँग सारख्या टोळ्या चर्चेत असताना आता या नव्या प्रकारची चर्चा होत आहे.

या परिसरात यापूर्वीही लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं असून फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर हादरले! अनैतिक संबंधामुळे वाद, तरुणाच्या तोंडावर महिलेने ओतले उकळते तेल; उपचारादरम्यान मृत्यू

Maharashtra News Live Update:विलास घुले हत्या प्रकरणात पुरवणी जबाब नोंदवला

Lonavala Tourism : विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा कडा, लोणावळ्यातील 'हे' ठिकाण पाहिल्यावर निसर्गाच्या किमयेवर विश्वास बसेल

Alka Yagnik : गायिका अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित; चालताना घ्यावा लागला आधार, 'तो' VIDEO पाहून चाहते चिंतेत

Police Transfers : राज्यात मोठा प्रशासनिक बदल! ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, २२४ निरीक्षकांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT