Buldhana Crime  Saam tv
क्राईम

Buldhana Crime : संशयाचं भूत मानगुटीवर! बायकोची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; नवऱ्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

man killed wife : बुलडाण्यातील एका व्यक्तीने घरात पत्नी एकटी असताना चारित्र्यावर संशय घेत पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली होती. . या प्रकरणी आरोपी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि १६५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संजय जाधव

बुलडाणा : बुलडाण्यातील एका व्यक्तीने घरात पत्नी एकटी असताना चारित्र्यावर संशय घेत पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर २ मुलींना तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु काही लोकांनी तिघांना सुखरुप बाहेर काढले होते. या प्रकरणी आता न्यायालयाने निकाल सुनावला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि १६५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बुलडाण्यातील त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमीजवळ असलेल्या जगदंबा नगरात ३५ वर्षीय पूजा उर्फ गीता ही आई-वडिलांकडे तीन मुलीसह राहात होती. 2011 मध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याचं रीती रिवाजाप्रमाणे लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर दोघांना तीन मुली झाल्या. परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तसेच मारहाण करायचा. तसेच शारीरिक व मानसिक छळ करायचा.

नवऱ्याने केलं भयंकर कृत्य

पूजाचे वडील सुरेश तायडे हे पूजा आणि आरोपी गजानन या दोघांना समज देऊन नांदवयास पाठवायचे. काही दिवसानंतर सततच्या त्रासामुळे कंटाळून पूजाही अंदाजे एक ते दीड महिन्यापूर्वी दोन मुलीसह माहेरी आली होती. काही दिवसांत तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा येथे आला. रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता.

आरोपीने मुलींसोबत मारली तलावात उडी

9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे आणि त्याची पत्नी व मुलगी अश्विनी ही बुलडाण्यामध्ये बाहेर कामानिमित्त गेली होती. पूजाच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या. आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा बेत होता. त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर चाकूने आठ वार करून तिची हत्या केली. दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये उडी घेतली.

तिघांनी तलावात उडी घेतल्यानंतर नागरिकांना त्यांना वाचविण्यात यश आलं. याप्रकरणी मृतकाचे वडील सुरेश तायडे यांच्या तक्रारीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर षारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात एकूण 15 साक्षीदार तपासल्यानंतर आरोप सिद्ध झाला. या प्रकरणात कलम 302 आणि 307 मध्ये आरोपीला आज 20 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा न्यायाधीश एस. बी.डिगे यांनी दिली आहे. सरकार पक्षाकडे जिल्हा सरकारी वकील एड.वसंत भटकर यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT