Crime News Saam TV
क्राईम

Crime : बुलढाण्यात थरारक घटना! सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या, मृतदेह जाळला अन्...

Maharashtra crime news today : बुलढाणा जिल्ह्यातील राहुड येथे सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Buldhana brother murder case details : बुलढाणा जिल्ह्यातील राहुड येथे सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशन संजय इंगळे, वय 36, याने खामगावातील रवी देवीदास राऊत यांच्या मदतीने धाकटा भाऊ चेतन इंगळे, वय 35, याचा खून केल्याची कबुली दिली आहे. २५ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या शेतात लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाकडांवर जाळून राख व अस्थी नदीत फेकण्यात आल्या. चेतन बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली असून हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे...या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

26 फेब्रुवारी 2026 बुलढाणा जिल्ह्यातील राहुड येथे सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून अस्थी व राख नदीत फेकून देण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशन संजय इंगळे (वय 36) याने आपल्या धाकट्या भावाचा, चेतन संजय इंगळे (वय 35), खून केला. या गुन्ह्यासाठी त्याने खामगावातील महाकाल चौक परिसरात राहणाऱ्या रवी देवीदास राऊत (वय 36) याची मदत घेतली.

२५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आरोपींनी स्वतःच्या शेतात चेतनला बोलावून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. गंभीर मारहाणीत चेतनचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शेतात लाकडे गोळा करून मृतदेह जाळला. त्यानंतर अस्थी व राख जवळच्या नदीत फेकून देण्यात आल्या. गुन्हा लपवण्याचा हा प्रयत्न पोलिस तपासात उघडकीस आला.

चेतन २५ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची चर्चा गावात सुरू होती. गावातील पोलीस पाटलांनी संशय व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार भागवत मुळीक व पथकाने तपास सुरू केला. संशयावरून रोशन इंगळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत विसंगती आढळल्याने अधिक तपास करण्यात आला. त्यानंतर खामगाव येथून रवी राऊत यालाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सख्ख्या भावानेच टोकाचं पावले का उचलली, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक वाद, कौटुंबिक कलह किंवा इतर कोणते कारण होते का, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या थरारक घटनेमुळे राहुड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारासंदर्भात सरकारचा नवा आदेश; 'ही' काम करा नाहीतर अडकेल पगार

Avdhoot Gupte: 'विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा...'; अवधूत गुप्तेंनी विद्यानंद बापटांसाठी लिहिलं खास गाणं, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: नागपुरातील इटाभट्टी परिसरात LPG वाहून नेणाऱ्या ट्रकमधून गॅसची गळती

Shocking: पाणी पुरवठ्यावरून सरपंचाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठं यश; 'लश्कर'च्या कमांडरला यूसमर्गच्या एन्काउंटरमध्ये टिपलं

SCROLL FOR NEXT