Buldhana Pankaj Deshmukh Death Case  Saam Tv News
क्राईम

Buldhana Crime : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती?; BJP कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

Buldhana Pankaj Deshmukh Case : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता आणि भाजप आमदार संजय कुटे यांचा वाहनचालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आलं आहे.

Prashant Patil

बुलढाणा : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता बुलढाण्यात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात असल्याची तक्रार पंकज देशमुख यांची पत्नी सुनीता देशमुख यांनी केली आहे. तसेच पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी देखील सुनीता देशमुख यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता आणि भाजप आमदार संजय कुटे यांचा वाहनचालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आलं आहे. ३ मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत आणि संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर आणि मानेवर अनेक जखमाही आढळल्या होत्या.

जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात केलं असं असलं तरी पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चाही जळगाव जामोद परिसरात होत होती. मात्र, आता पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती आणि बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची तक्रार केली आहे. सोबतच जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून जळगाव जामोद पोलिसांवर माझा विश्वास नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन गंभीर वळण मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red lights on towers: उंच टॉवरवर का चमकत असते लाल रंगाची लाईट?

Maharashtra News Live Update: जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत तिरंगा रॅली, हजारोंचा सहभाग

Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

Military Sleep Method: रात्री लवकर झोप येत नाही? मग 'मिलिटरी स्लीप मेथड' वापरुन येईल २ मिनिटांत गाढ झोप

SCROLL FOR NEXT