Buldhana Crime News Saam tv
क्राईम

Buldhana Crime News : आश्रम शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरण, मुख्य आरोपीला ५ वर्षांची शिक्षा, १७ जण निर्दोष

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निकाल खामगाव न्यायालयाने दिला आहे. मुख्य आरोपी इत्तू सिंग पवार याला ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून उर्वरित १७ आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले आहेत.

Alisha Khedekar

  • बुलढाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निकाल लागला.

  • मुख्य आरोपी इत्तू सिंग पवार याला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • उर्वरित १७ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.

  • या घटनेनंतर संबंधित शाळा बंद करण्यात आली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील श्री निना भाऊ कोकरे आश्रम शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनींवर २०१६ साली लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण गाजलं होतं. याप्रकरणी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देत यातील मुख्य आरोपी असलेला इत्तू सिंग काळू सिंग पवार यास दोषी धरत पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्रकरणातील उर्वरित १७ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. काल खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

काय होत प्रकरण..?

खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली होती. पिडीत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांच्यासह १२ जणांना केली होती. या प्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या आदेशाने एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.

खामगाव तालुक्यातील पाळा येथे स्व.निनाभाऊ कोकरे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा होती. प्राथमिक व माध्यमिक अनेक विध्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. दरम्यान दिवाळीच्या सुट्टया लागल्याने विद्यार्थी त्यांच्या गावी गेले होते. जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणाºया अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती सांगितली. ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

सदर प्रकार गंभीर असल्याने पालकांनी गावातील पोलीस पाटील व सरपंच यांना माहिती दिली. त्यानंतर घडलेला प्रकार माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या कानावर घालण्यात आला. आ.खडसे यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे सांगितले. तसेच कृषीमंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. ना. फुंडकर यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी पोलिसांनी सदर प्रकरणातील १२ आरोपींना अटक केली होती.

मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली

पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त पालकांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेवून ठिय्या मांडला. यावेळी तत्कालीन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पोलीस स्टेशनला भेट देवून घटनेची परिस्थिती जाणून घेतली होती. सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.

सरकारने या शाळेची मान्यता त्यावेळी काढून घेत ही शाळा बंद केली होती व अद्याप ही शाळा बंद आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यावेळी या घटनेचे पडसाद उमटले. अनेक मंत्री, विविध पक्षाचे नेते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्यावेळी भेट दिली होती. प्रादेशिक व देश पातळीवरील माध्यमांनीही या घटनेची दखल घेत वृत्तांकन केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi : अनुदानित युरिया खताचा अवैध साठा; २ ट्रक खत जप्त, गोडाऊनला लावले सिल

Today Gold Rate : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याने उच्चांक गाठला; ३ आठवड्यांत ७००० रुपयांची वाढ, १ तोळ्याचा भाव काय?

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात भरधाव कारने महिला आणि शाळकरी मुलाला उडवले

ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसात मिळतो? असं स्टेटस करा चेक

Flight Emergency : आकाशात थरार, एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? ९ जण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT