Buldhana Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : "तू कुठेतरी जाऊन मर..." पत्नीच्या अपमानाला कंटाळून पतीने केली हत्या; कुऱ्हाड उचलली अन्...

Buldhana Crime News : बुलढाण्यात पत्नीने सतत अपमान केल्याच्या रागातून पतीने कुऱ्हाडीने पत्नीची हत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • बुलढाणा येथे पतीकडून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

  • सततच्या अपमानाला कंटाळून आरोपीने गुन्हा केल्याची कबुली

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे

  • घटनेने गावात व जिल्ह्यात खळबळ

बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी पतीला नेहमी अपमानास्पद वागणूक देत असल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. सदर घटना मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला लक्ष्मी पवन धंदाळे (२४ वर्षे ) ही तिचा पती पवन गजानन धंदाळे (२८ वर्षे ) याचा सतत अपमान करत होती. तू काम करत नाहीस, तू कुठेतरी जाऊन मर ह्या शब्दात बोलून लक्ष्मी पवनचा अपमान करत होती. वारंवार सुरु असलेल्या अपमानाला कंटाळलेल्या पवनने संतापून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली.

या झटापटीत महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनस्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी पवन याला पोलिसांनी अटक केली असून आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी आरोपी विरुद्ध कायमी अपराध क्रमांक 580/ 2025 कलम 103 (1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून हा तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे ह्या करीत आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minister Gogawale Video: शिंदेसेनेच्या आमदारानंतर मंत्र्यावर कॅशबॉम्ब, दळवींनंतर गोगावलेंचा नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ

Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT