wife killed husband  Saam tv
क्राईम

Crime News : मम्मी खूप वाईट, तिनेच पप्पांना मारलं; प्रेमात आंधळ्या झालेल्या आईचा राक्षसी चेहरा 9 वर्षांच्या मुलानं डोळ्यांनी पाहिला

wife killed husband : प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आहे. हा संपूर्ण प्रकार मुलाने पाहिला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : महिलेने बॉयफ्रेंडच्या साथीने स्वत:च्या नवऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिलेच्या बॉयफ्रेंडने चार जणांना हत्येची सुपारी दिली होती. महिलेचा बॉयफ्रेंड आणि चार जणांनी मिळून ९ वर्षांच्या मुलासमोरच वडिलांची हत्या केली. या हत्येचा संपूर्ण थरार ९ वर्षांच्या स्वत:च्या डोळ्याने पाहिला. या घटनेनंतर आई आणि तिच्या बॉयफ्रेंडने वडिलांची हत्या केल्याचे ९ वर्षांच्या मुलाने पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक वीरू जाटव यांची बायको अनिताचे एका विक्रेत्यासोबत अनैतिक संबंध होते. अनिताला ९ वर्षांचा मुलगा होता. तरीही अनिता ही काशिराम नावाच्या विक्रेत्याच्या प्रेमात आंधळी झाली होती. या दोघांनी मिळून वीरु जाटव यांची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी अनिता आणि तिच्या बॉयफ्रेंडने चार जणांना हत्येसाठी २ लाखांची सुपारी दिली. पोलिसांनी या प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये संपूर्ण प्रकार घडला आहे.

९ वर्षांच्या मुलाने काय सांगितलं?

९ वर्षांच्या मुलाने पोलिसांना सांगितलं की, 'खाटेचा आवाज आल्याने मला जाग आली. त्यावेळी काशिराम उशीने वडिलांचा चेहरा दाबत होता. तर आई बाजूला उभी राहून बघत होती. मी हस्तक्षेप करायला गेलो, त्यावेळी काशिरामने मला धमकी दिली. त्याने मला शांत राहायला सांगितले'.

आरोपींची घरात हळूच एन्ट्री

मुलाचे वडील उशिरा घरी परतले. त्यावेळी त्यांनी आईला मोबाईल चार्जिंग करण्यास सांगितलं. नंतर वडील झोपी गेले. त्यानंतर आईचा बॉयफ्रेड आणि चार जणांनी घरात हळूच एन्ट्री मारली. मुलगा म्हणाला, 'मी वडिलांवर हल्ला होताना होताना पाहिलं. वडिलांची हत्या होताना आई शांतपणे बघत होती. वडिलांवर हल्ला होताना मी अडवायला गेलो. त्यावेळी काशिरामने मला धमकावलं. मम्मी खूप वाईट आहे. तिनेच वडिलांची हत्या केली, असे मुलाने सांगितलं.

अनिता आणि वीरू या दोघांचा घटस्फोट झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता. वीरू यांच्याशी लग्न केलेल्या अनिताचं दुकान देखील होतं. तर काशिराम जवळच स्नॅक्स विकायचा. दोघांमध्ये जवळीक वाढली होती. प्रेमात आंधळे झालेल्या दोघांनीच वीरू यांची हत्या झाल्याचे उघड झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Nachnichi Bhakri Recipe : गावाकडे बनवतात तशी मऊ-लुसलुशीत नाचणीची भाकरी, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi Serial Off Air : "...One Last Time"; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीनं केली खास पोस्ट

iPhone युजर्ससाठी धक्का! Truecaller मधील कॉल रेकॉर्डिंग फीचर होणार बंद, बॅकअपसाठी 'असा' उपाय करा

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT