Indigo Flight
Indigo Flight Google
क्राईम

Bomb Threat: 'बॅगेत बॉम्ब आहे, विमान लँड होताच धमाका होणार'; चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाला धमकी

Rohini Gudaghe

Bomb Threat In Chennai Mumbai Flight

मुंबई विमानतळावर ( Mumbai Airport) इंडिगोचे विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंडिगो एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, चेन्नईहून मुंबईला येणारे इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E5188 मंगळवारी मुंबईत उतरणार होते. तेव्हा पार्किंग परिसरात बॉम्बची धमकी मिळाली.  (Latest Crime News)

विमान कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. फ्लाइटने लँडिंगची प्रक्रिया सुरू करताच बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली होती. वैमानिकाने तातडीने विमानतळ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अशा परिस्थितीत पाळला जाणारा आवश्यक प्रोटोकॉल तातडीने सुरू करण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेसेज

चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट (Indigo Flight) 6E-5188 ला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. विमानाच्या टॉयलेटमध्ये एका टिश्यू पेपरवर धमकीचा मेसेज आढळून आला होता. माझ्या बॅगमध्ये बॉम्ब आहे. आपण मुंबई विमानतळावर उतरताच मोठा धमाका होईल, आपण सगळे मारले जावू. मी दहशतवादी एजन्सीमधून आहे. बदला घेण्यासाठी हे कृत्य करत असल्याचं चिठ्ठीत म्हटलं होतं.

या घटनेमुळे विमानामध्ये एकच खळबळ उडाली होती. सर्व प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण (Bomb Threat In Indigo Flight) होतं. सर्व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत विमानाची तपासणी यावेळी करण्यात आली. परंतु विमानात बॉम्ब काही आढळला नव्हता.

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने विमानाची तपासणी

उड्डाणाच्या तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही. विमानाला दुर्गम ठिकाणी नेऊन तपास पूर्ण केल्याचं विमानतळ सूत्रांनी सांगितले आहे. तपासणीमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यानंतर विमान पुन्हा टर्मिनलवर आणण्यात आलं. चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानाला ( Chennai Mumbai Flight) विमानतळावर लँडिंगच्या 40 किलोमीटर आधी धमकी मिळाली होती. एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश मिळाला होता.

काही काळ विमानातीस प्रवासी घाबरले होते. प्रवासी सुखरूप उतरल्यानंतर विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने विमानाची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, विमान लँड होताच, तेथे मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी उपस्थित (crime news) होते. पण, विमान कंपनीचे अधिकारी आणि सुरक्षा दलांनी हुशारीने काम केले. यापूर्वी 4 महिन्यांपूर्वी मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

Raw Banana Benefits: हिरवीगार कच्ची केळी खाण्याचे फायदे माहित आहेत का?

Today's Marathi News Live: शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, रावसाहेब दानवेंचं विधान

SCROLL FOR NEXT