Bihar Patna Crime News Saam tV
क्राईम

Shocking : संक्रांतीला माहेरी गेली, शेजारच्या कुटुंबाने चेटकीण समजून जीव जाईपर्यंत मारलं; नेमकं प्रकरण काय?

Bihar Patna Crime News : पाटणाजवळील बिहटा येथे चेटकीण असल्याच्या संशयावरून ३२ वर्षीय महिलेची काठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. अंधश्रद्धेमुळे घडलेल्या या घटनेने परिसर हादरला आहे.

Alisha Khedekar

  • चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेची हत्या

  • अंधश्रद्धेमुळे घडलेली धक्कादायक घटना

  • हल्ल्यात कुटुंबातील इतर सदस्यही जखमी

  • पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला

बिहारची राजधानी पाटणाजवळील बिहटा येथे एका महिलेला चेटकीण असल्याच्या संशयावरून मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बिहटा पोलीस स्टेशन परिसरातील वाजितपूर गावात मकर संक्रांतीच्या दिवशी एक ३२ वर्षीय महिला तिच्या माहेरी आलेली. या महिलेच्या माहेरच्या शेजारील घरात एका ६ वर्षीय मुलाचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर मृत मुलाच्या कुटुंबीयांना महिलेवर चेटकीण असल्याचा संशय आला. बुधवारी दुपारी महिलेला एकटी पाहून मृत मुलाच्या कुटुंबीयांनी घरात घुसून तिला काठ्यांनी मारहाण केली.

गोंधळ ऐकून महिलेचे कुटुंबीय आणि शेजारी हस्तक्षेप करण्यासाठी धावले. या हाणामारीत महिलेचे वडील, आई आणि काका यांच्यासह पाच जण जखमी झाले. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी महिलेला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान याप्रकरणी हाणामारी करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यात ठिबक कंपनीला अचानक लागली भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Ajit Pawar death : रोहित पवार यांचा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले?

ST Mahamandal: लाडक्या बहिणींमुळे एसटी महामंडळाचे अच्छे दिन; सरकारकडून परिवहन विभागाला ५०८० कोटी रुपये

Nikki Tamboli: बिग बॉस फेम निक्की तांबोळीची झाली फसवणूक; चाहते आणि घरच्यांना दिला सावध राहण्याचा इशारा

Ajit Pawar Death: अजित पवारांचा घातपात झाला, रोहित पवारांच्या संशयावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT