Bihar Crime Saam Tv
क्राईम

Crime: शौचाला गेलेल्या महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शरिरावर ब्लेडने अनेक वार अन्...; आरोपींनी गाठला विकृतीचा कळस

Bihar Crime: बिहारमध्ये विवाहित महिलेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. शौचाला गेलेल्या महिलेचे अपहरण करून तिच्या शरीरावर आरोपींनी ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.

Priya More
  • बिहारमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

  • ५ जणांनी अपहरण करून केलं भयंकर कृत्य

  • महिलेच्या शरीरावर ब्लेडने अनेक वार करण्यात आले

  • पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

बिहारमध्ये शौचासाठी घराबाहेर गेलेल्या महिलेचे अपरहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. बिहारच्या बेगुसराय येथे ही घटना घडली. ५ जणांनी महिलेचे अपहरण केले. तिचे हात-पाय बांधले, तिच्या शरीरावर ब्लेडने वार केले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपी ऐवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनीतिच्या गुप्तांगात गोळी, दगड आणि लाकूड टाकले.

घटनेच्या सहाव्या दिवशी असह्य वेदना होऊ लागल्यानंतर पीडितेला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या अल्ट्रासाऊंडमध्ये पीडित महिलेच्या गुप्तांगात गोळ्या, दगड आणि लाकूड आढळून आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

ही घटना ११ जून रोजी रात्री घडली. महिला शौचाला बसली होती. त्याचवेळी ५ जणांनी तिला जबरदस्ती ओढत नेले. तिचा ब्लाऊज फाडला आणि त्यानेच तिचे हातपाय बांधले. आरोपींनी महिलेच्या शरीरावर ठिकठिकाणी ब्लेडने वार केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिच्या गुप्तांगात गोळअया, दगड आणि लाकडी काठी घातली.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ जून रोजी संध्याकाळी उशिरा तपासणीनंतर तिला घरी सोडण्यात आले. पण घरी आल्यानंतर प्रचंड वेदना होत राहिल्याने १७ जून रोजी ती पुन्हा रुग्णालयात गेली. त्याठिकाणी तिची अल्ट्रासाउंड केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून गोळी, दगड आणि लाकडाचा तुकडा काढण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला पण कोणतीही कारवाई केली नाही.

दरम्यान, ३ महिन्यांपूर्वी ३ गुंडांनी घरात घुसून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली होती आणि लूट करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तर या गुंडांनी थेट महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT