Crime News Saam TV
क्राईम

Crime News: पती शारीरिक संबंध ठेवत नसल्याने पत्नीची पोलिसांत धाव; विविध कलमांअंतर्गत FIR दाखल

Wife Files Case Against Husband: पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भारतीय दंड संहितेच्या कलम ३४१, ३२३, ४९८ए, ३७९, ५०४, ५०६, ३४ अन्वये एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Ruchika Jadhav

Bihar:

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्नाला २ वर्षे झाले मात्र अद्यापही पतीने माझ्यासोबत शरीरिक संबंध ठेवले नाहीत. काही विचारले असता तो मला मारहाण करतो, असं पत्नीने म्हटलंय.

पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भारतीय दंड संहितेच्या कलम ३४१, ३२३, ४९८ए, ३७९, ५०४, ५०६, ३४ अन्वये एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ३१ मे २०२१ रोजी महिलेचे अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या व्यक्तीशी लग्ना झाले.

लग्नानंतर इतर जोडप्याप्रमाणे त्यांच्यात कोणताही संवाद होत नव्हता. पत्नीला सतत घरातील कामात व्यस्त ठेवले जात होते. पत्नीने जवळ येण्याचा प्रयत्न केल्यास पती तिला दूर लोटायचा, मारहाण करायचा. हा सर्व प्रकार २ वर्षे तसाच सुरू राहिला. त्यामुळे पत्नी तिच्या सासूला ही माहिती सांगितली.

सासूला असे सांगितल्यावर सासूने तिला मारहाण केली. तसेच पतीने देखील तिला पुन्हा मारहाण केली. तिचे घरातून बाहेर पडणे बंद केले. महिलेला कुणाशीही संवाद साधता येत नव्हता. शेवटी माहेरी कोणीतरी आजारी असल्याच्या बहाण्याने ती या घरातून बाहेर पडली. आपल्या माहेरी आल्यावर तिने घरच्यांना याबाबत माहिती सांगितली. मुलीचा त्रास पाहून तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळाल्यावर त्यांनी पतीची आणि त्याच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. पतीचे बाहेर अन्य दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT