HUSBAND KILLS WIFE OVER AFFAIR SUSPICION IN BIHAR JAMUI SHOCKING CRIME Saam tv
क्राईम

Shocking : भयंकर! पत्नीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या पतीने काढला काटा; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला

Bihar Crime News : बिहारमधील जमुई जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अफेअरच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बिहारच्या जमुई जिल्ह्यात पतीने पत्नीची हत्या केली

  • अनैतिक संबंधांच्या संशयातून गुन्हा घडला

  • आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली

  • प्रकरणामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण

बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गंगोडीह गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे बायकोची हत्या केल्यानंतर पती तिच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. मृत महिलेचे नाव उगनी देवी अशी पटली आहे. तर आरोपी पतीचे नाव गगन मांझी असे असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला त्याच्या पत्नीवर संशय होता, की त्याच्या पत्नीचं बाहेर अफेअर सुरु आहे. मात्र त्याच्या हातात पुरेसे पुरावे नव्हते. एक दिवस अचानक गगन मांझी कामावरून लवकर घरी गेला असता, त्याची बायको बेडरूममध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत आढळली.

संतप्त झालेल्या आरोपीने त्याच्या पत्नीला जाब विचारला असता तिने टाळाटाळ केली. यावरून त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधांच्या संशयावरून गगन मांझीने रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे त्यानंतर तो मृतदेहाशेजारी तसाच बसून राहिला. माहिती मिळताच खैरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जमुई सदर रुग्णालयात पाठवला. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मिंटू कुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esakal: जागतिक घडामोडी अन् त्याचे तुमच्यावर होणारे परिणाम; सर्वकाही वाचता एका क्लिकवर; वाचा सकाळचं नवं न्यूजलेटर

Loneliness Side Effects : ऑफिस अन् शिक्षणासाठी तुम्ही एकटे राहताय? सावध व्हा! नाहीतर 'या' गंभीर आजारांना बळी पडाल

Modi-Meloni Photos: पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांची मैत्री अतूट, रोममधील फोटो पाहिलेत का?

Maharashtra News Live Update : यवतमाळात औषधी विक्रेत्यांचा भव्य मुक मोर्चा

Modi Meloni Video : पंतप्रधान मोदींनी मेलोनींना दिली 'गोड' भेट; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, 'मेलोडी...'

SCROLL FOR NEXT