bhosari police arrests youth in kasarwadi Saam Digital
क्राईम

Pimpri Chinchwad Crime News: कासरवाडीच्या युवकांकडून वाहनाची तोडफोड, पाच जणांवर गुन्हा दाखल, एकास अटक

पाेलिसांकडून घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : बार चालकाने बियरचे पैसे संशयित आरोपींकडे मागितल्याने संतापलेल्या कासरवाडीच्या पाच जणांनी बार मालक आणि बार मॅनेजरला धमकावले.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad :

पिंपरी चिंचवड शहरातील कासरवाडी परिसरात गाव गुंडांनी चारचाकी वाहनांची काठ्या आणि दगडाच्या साह्याने तोडफोड केली. या प्रकरणी पाच जणांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे. पाेलिस अन्य चार संशयित आरोपींचा शोध घेताहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : बार चालकाने बियरचे पैसे संशयित आरोपींकडे मागितल्याने संतापलेल्या कासरवाडीच्या पाच जणांनी बार मालक आणि बार मॅनेजरला धमकावले. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली.

हे पाच जण वाहनांची तोडफोड करत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. कासरवाडीचे भाई आहोत...... आम्हाला पैसे मागतो का ? असा आव आणत संशयितांनी चार चाकी वाहनांची तोडफोड केल्याची तक्रार त्यांच्या विराेधात पाेलिसांत नाेंदवली गेली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी भोसरी पोलिसांनी ऋषिकेश उर्फ मुंगळ्या विश्वनाथ मोटे, अरमान कपिल देशमुख, रोहित कदम, अभी भोरे आणि शिवा पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ऋषिकेशला भोसरी पोलिसांनी अटक केली. अन्य चाैघांचा पाेलिस शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT