accused who killed elderly woman Saam Tv
क्राईम

Bhiwandi News : ऑनलाईन रमी जुगाराच्या नादात कर्जाचा डोंगर; वृद्ध महिलेचा खून करून घर पेटवलं, लाखोंचे दागिने लुटले

Police arrested accused who killed elderly woman : भिवंडीत वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला ३६ तासांतच पोलिसांनी अटक केल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

फैयाज शेख, साम टीव्ही भिवंडी

भिवंडीमधून एका वयोवृद्ध महिलेच्या खुनाची घटना समोर आलीय. आरोपीनं ऑनलाईन रमी जुगाराच्या नादात वयोवृद्ध महिलेची निर्घृण हत्या केली.त्यानंतर घराला आग लावून लाखोंचे दागिने घेऊन पळाला (Bhiwandi crime News) होता. पोलिसांनी वेगाने तपासाची सुत्र फिरवत आरोपीला ३६ तासांत अटक केलीय. आपण या घटनेबद्दल अधिक सविस्तर जाणून घेवू या.

कर्ज फेडण्यासाठी हत्येचा कट रचला

ऑनलाईन जुगार खेळाच्या (online rummy) नादात कर्जबारी झालेल्या तरुणाने कर्ज फेडण्यासाठी हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय. ही घटना भिवंडी तालुक्यातील भुईशेत गावच्या हद्दीत झाटेपाडा, येथील आरिफ फार्म हाऊसमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशी आरोपी वयोवृद्ध महिलेचा गळा कापुन, अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने चोरी करुन घराला आग लावुन फरार झाला होता.

आरोपीला ३६ तासाच्या आत अटक

मात्र, भिवंडी ग्रामीण तालुका पोलिसांनी तपासाची चक्रं जलदगतीने फिरवत आरोपीला ३६ तासाच्या आत ठाण्यातील एका लॉजिंगमधून अटक केलीय. अभिमन्यु गुप्ता, असं अटक केलेल्या आरोपीचं नाव (crime news) आहे. तर सेल्वामेरी अगस्टीन नाडर, (वय ७४) असं निर्घृण हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलेचं नाव आहे. मृत महिलेच्या मुलाकडे आरोपी कामाला होता. त्यामुळे त्याला मृत महिलेच्या घरात दागिने असल्याचे माहित होतं.

गुन्हा केला कबूल

आरोपी अभिमन्यू गुप्ता याला रमी जुगार खेळण्याचा नाद लागला होता. त्यामुळे ऑनलाईन रमी जुगारात एक ते दीड लाख कर्ज झाल्याने ते कर्ज फेडण्यासाठी त्याने कट रचला. या महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील आणि घरातील दागिने (killed elderly woman) घेतले. त्यानंतर हत्येचा संशय येऊ नये म्हणून घराला आग लावून त्या आगीत मृतकचा जळून मृत्यू झाला असे भासवत पळून गेला, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिलीय. आरोपीला १७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT