bhadrakali police arests five in shani shingnapur nashik crime news sml80 Saam Digital
क्राईम

Nashik Crime: शनि शिंगणापूरमधून पंचवटीमधील पाच जणांना अटक; भद्रकाली पोलिसांची कारवाई

या संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून याआधी देखील यांच्यावर काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

जुन्या नाशिक येथे गुरुवारी (ता. १६ मे) उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गाड्या जाळल्या प्रकरणी आणि जाळण्यासाठी सुपारी दिल्याचा संशयावरुन मुख्य सूत्रधारासह पाच जणांना भद्रकाली पोलिसांनी शनिशिंगणापूर येथून अटक केली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार जून्या नाशिक परिसरातील चार भागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी अशा तब्बल 11 ते 12 वाहनांची जाळपोळीची घटना घडली होती. या प्रकरणी सनी संजय गावडे, प्रशांत बाळासाहेब फड, प्रविण बाळु कराटे, आकाश राजु सांळुके, विजय सुरेश लोखंडे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे सगळे पंचवटी परिसरात राहणारे आहेत.

या संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून याआधी देखील यांच्यावर काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT