Bengaluru Crime Saam Tv
क्राईम

Crime News: इमारतीचा तिसरा मजल्यावर फ्लॅटमधील थरकाप उडवणारं दृश्य; २५ वर्षीय तरुणीसोबत घडलं भयंकर

Bengaluru Crime News: निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bengaluru Crime News

बऱ्याच दिवसांपासून बंद असलेला तिसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट, त्यामधून येत असलेला कुजकट वास, फ्लॅटचा दरवाजा उघडताच २५ वर्षीय तरुणीचा कुजलेला आणि नग्नावस्थेत चादरीत गुंडाळलेला मृतदेह, बाजूलाच नशेचे पदार्थ आणि सिरिंज...हे भयानक आणि अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य होतं बेंगळुरू(Bengaluru)तील चांदपुरा परिसरातील एका इमारतीतलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बेंगळुरूतील चांदपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. मृत तरुणी मूळची पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती आहे.

तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. ही तरुणी अंदाजे २५ वर्षांची असावी आणि ती पश्चिम बंगालची असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अॅटॉप्सी रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. ज्या फ्लॅट(flat)मध्ये मृतदेह आढळून आला, तिथे या तरुणीला एका चाळिशीतल्या व्यक्तीसोबत अखेरचं बघितलं होतं अशी माहितीही समोर आली आहे.

तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे शरीरावर कोणत्या जखमा होत्या का, याबाबत काहीही कळू शकलेलं नाही. अॅटॉप्सी रिपोर्टमधून तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

मालकिणीला संशय आला अन्...

पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या सनगेथ गुप्ता यांच्या मालकीची ही इमारत आहे. त्या स्वतः पतीसोबत तळमजल्यावर राहतात आणि उर्वरित मजल्यावरील घरे त्यांनी भाड्याने दिली आहेत. मागच्या डिसेंबरमध्ये एका व्यक्तीने त्यांच्याकडील एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. सफन आणि मूळचा ओडिशाचा असल्याची ओळख त्याने स्वतः करून दिली होती. १० जानेवारीनंतर तो कुठेही दिसला नाही. त्याने घराचे भाडे दिले होते. त्याची बायको गावी असून, तिला लवकरच घेऊन येणार असल्याचे तो मालकिणीला सांगून गेला होता.

२८ फेब्रुवारीला सफनने घेतलेल्या फ्लॅटमध्ये एक चाळिशीतील व्यक्ती आणि त्याच्यासोबत अंदाजे विशीच्या आसपास असलेली तरूणी दिसून आली होती. याबाबत मालकिणीने सफनला विचारणा केली होती. त्यावर दोघे बाप-लेक असून मी त्यांना ओळखत असल्याचे त्याने सांगितले होते. तीन दिवसांनंतर ते खोली सोडतील असेही त्याने सांगितले होते.

१० मार्च रोजी मालक असलेले गुप्ता दाम्पत्य फ्लॅटकडे गेले. फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. आतमध्ये तरुणी अंगावर चादर घेऊन झोपलेली दिसली. मात्र, त्यावेळी त्यांना काहीच संशय आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने त्यांनी पुन्हा फ्लॅटकडे धाव घेतली. ती तरुणी होत्या त्याच अवस्थेत दिसून आली. त्यांनी अंगावरील चादर हटवून बघितले असता, तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. हे दृश्य बघून त्यांना मोठा धक्का बसला.

बेंगळुरूचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन यांनी सांगितले की, पांढऱ्या रंगाची पावडर आणि सिरिंज त्या खोलीत आढळून आल्या. ते अंमली पदार्थ असावे, असा संशय आहे. दरम्यान, सफानकडून संबंधित तरुणीची कोणतीही कागदपत्रे देण्यात आली नव्हती, अशी माहिती घराच्या मालकिणीने दिली. सफन आणि त्याच्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन बंद आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT