Beed Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : भावकीनं केला घात! शेतीच्या वादातून महिलेवर हल्ला, बीड जिल्ह्यात खळबळ

Beed Crime News : बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून महिलेवर भावकीतील चार जणांनी अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला

  • आश्विनी येडे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

  • आरोपी भावकीतील चार जण आहेत

  • घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपास सुरू आहे

बीड मधून धक्कदायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पीडितेचं नाव आश्विनी येडे असे आहे. आश्विनी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड मधील नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात राहणाऱ्या आश्विनी येडे या महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही मारहाण भावकीतील चार जणांनी केल्याचे उघड झाले आहे. तसेच शेतीच्या वादातून आश्विनी येडे या महिलेवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आश्विनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असून बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daya Dongre: चित्रपटात आपला ठसा उमठवणाऱ्या दया डोंगरे निवडणार होत्या 'हे' करिअर; पण झाल्या अजरामर अभिनेत्री

Bihar Election: ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान RJDने आपल्याच उमेदवाराला पक्षातून काढलं? काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण; सोशल मीडियावर हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ पोस्ट

Dev Diwali: यंदा देव दिवाळी कधी? पूजेचा शूभ मूहूर्त किती वाजता? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे ₹१५०० उद्यापासून मिळणार

SCROLL FOR NEXT