Beed crime: Shocking video of journalist’s son Yash Dhaka’s murder goes viral, sparking outrage. saam tv
क्राईम

Beed Crime: पाठलाग करत गचांडी पकडली अन्...; बीडमधील पत्रकाराच्या मुलाच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल

Local Journalist Son Stabbed To Death CCTV Video Viral: बीडमध्ये एका पत्रकाराच्या मुलाची भरचौकात निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे आणि पोलिस तपास सुरू आहे.

Bharat Jadhav

  • बीडमध्ये पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याचा खून.

  • वाढदिवस पार्टीतील वादातून हत्येची घटना घडली.

  • खूनाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

खून, हाणामारी अशा घटनांमुळे बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तीन दिवसापूर्वी बीड शहरात झालेल्या पत्रकाराच्या मुलाच्या हत्येची घटना घडली होती. भर चौकात चार जणांच्या टोळीनं त्याचा मुलाचा खून केला होता. शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची हत्या करण्यात आली होती. हल्ल्याचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागले आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी परिचित असलेले पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा मित्रांसोबत बर्थडे पार्टीला गेला होता. आणि यादरम्यान वाद झाला. या वादामध्ये यश ढाका याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.

यश ढाकाच्या हत्येच्या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडालीय. पूर्व वैमनस्यातून यशचा खून झाला होता. हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वर्दळ असलेल्या ठिकाणी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करत यशची हत्या करण्यात आली होती. वाढदिवसाच्या पार्टीत हल्लेखोर आणि यश यांच्यात वाद झाला होता. त्या वादातून भरचौकात यशची हत्या करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

SCROLL FOR NEXT