crime news beed  saam tv
क्राईम

Beed Crime: हॉर्न वाजवल्याने सटकली, अपहरण करून शेतकऱ्याला टेकडीवर नेलं, बेल्टने अमानुष मारहाण; बीडमध्ये गीते-मुंडे टोळीचं कांड|VIDEO

Munde Gang: बीड जिल्ह्यात सध्या चाललय काय हा प्रश्न आख्या महाराष्ट्राला पडला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीडमधील अनेक प्रकरण समोर येत आहे. अशातच एक जुनी घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवितो,असे विचारल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला टेकडीवर नेले. त्यानंतर बेल्टने मारहाण केली. तोंडवर, नाकावर बुक्यांनी मारहाण केली.

हा प्रकार जुलै २०२४ मध्ये घडला होता. या मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला होता. आता नऊ महिन्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन मुंडे, आदित्य गित्ते, सुमित उर्फ बबलू बालाजी गित्ते अशी आरोपींची नावे आहेत. यातीलच सचिन मुंडे, आदित्य गित्ते,आरोपी यांनी शिवराज दिवटे याला अमानुष मारहाण केली होती त्या आरोपीच्या अटकेनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता याही प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मुंडे आणि गित्ते टोळीचे पाय आणखी खोलात गेलाच दिसत आहे.

परळी तालुक्यामध्ये नंदागौळ गावातील योगीराज अशोक गित्ते (वय ३२) या शेतकऱ्याने नऊ महिन्यानंतर पोलिसांना फिर्याद दिली आहे. आदित्य व सचिन हे अनेकदा घरासमोरुन दुचाकीवरून ये-जा करताना हॉर्न वाजवायचे. एकेदिवशी त्यांची गाडी थांबवुन तुम्ही असे का करता, असे म्हणाल्यावर 'तुझ्या बापाचा रस्ता आहे काय, आम्ही काही पण करु. तू आमच्या नादी लागू नको नाही तर तुझ्याकडे बघावे लागेल' असे म्हणून ते निघून गेले. २५ जूलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता योगिराज हे घरी जाताना नंदागौळ ते घाटनांदुर जाणारे रस्त्यावरील पाण्याचे टाकीजवळ आल्यावर आदीत्य गित्ते व सचिन विष्णु मुंडे हे दुचाकीवरून आले.

योगिराज यांना अडवून त्यांची कॉलर पकडत दुचाकीवर बसवून विठ्ठल टेकडी येथे नेले. तेथे सुमीत हा होता. तेव्हा सचिन मुंडे व आदित्य गित्ते यांनी 'तू लई माजलास का आम्हाला रस्त्यात थांबऊन दुचाकीवर रेस का करतो म्हणून विचारतो का' असे म्हणून दोघांनी शिवीगाळ करुन सचिन मुंडेने बेल्टने तोंडावर, पाठीवर, पायावर आणि हातावर मारहाण करून जखमी केले. पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून योगिराज यांना तेथेच सोडून ते निघून गेले. तक्रार दिली तर ते पुन्हा मारतील, या भितीने उशीर झाल्याचे कारण योगिराज यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT