Beed Crime Saam Tv
क्राईम

Beed Crime: अपहरण केलं अन् दारू पाजली, नंतर ७ तास डांबून अमानुष मारहाण; बीडमध्ये गुंडाराज सुरूच|VIDEO

Beed Police: बीडमध्ये तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगावच्या पात्रुड येथील ही घटना आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण करून तरुणाला दारू पाजली. त्यानंतर तब्बल सात तास डांबून त्याला अमानुष मारहाण केली. पात्रुड येथील ही घटना आहे. या मारहाणीत आप्पा राठोड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि संपूर्ण अंगावर मारहाण केल्याचे व्रण उटले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील आप्पा काशिनाथ राठोड या तरुणाचे रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले. रमेश पवार आणि इतर पाच ते सहा जणांनी त्याचे अपहरण केले. अपहरणानंतर त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्याला तब्बल सात तास डांबून अमानुष मारहाण केली. आरोपींनी तब्बल सात तास मारहाण केल्यानंतर सोमवारी पहाटे तीन वाजता या तरुणाला सोडून दिलं.

गंभीर जखमी झालेल्या आप्पा राठोड यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या तरुणाच्या डोक्याला सात टाके पडले असून शरीरावर मारलयाचे लालभडक रंगाचे व्रण दिसत आहेत. माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली असून अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आप्पा राठोड यांनी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आप्पा राठोड या तरुणाच्या ओळखीच्या व्यक्तीनेच त्याचे अपरहण केले होते. चहा पाजतो असे म्हणत दुचाकीवर बसवून त्याचे अपरहण केले आणि त्यानंतर अमानुष मारहाण केली. अप्पासाहेब गोरसेना संघटनेत सक्रिय आहे. तो समनक संघटनेचेही पदाधिकारी आहे. आप्पाचे अपहरण केलेल्या रमेश पवार या व्यक्तीने भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे आप्पाने त्याला पद देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून त्यांच्यासोबत हे भयंकर कृत्य करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णय

Pune News: पुण्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, पार्थ पवारांना अडचणीत आणणारी शीतल तेजवानी आहे तरी कोण?

Samsung Galaxy S24 Ultra वर मेगा डिस्काउंट, फ्लिपकार्टवर तब्बल हजारोंची मोठी सूट

Ladki Bahin Yojana: ६ लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; आदिती तटकरेंनी कारणच सांगितलं

SCROLL FOR NEXT