बीडमध्ये कराड गँगकडून एका तरुणावर अमानुष मारहाण करत नाक घासून माफी मागायला लावली.
या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला.
मुख्य गुन्हेगार वाल्मीक कराड जेलमध्ये असूनही टोळीच्या हालचाली सुरूच आहेत.
पोलीस तपास सुरू असून, आरोपींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
योगेश काशिद, साम प्रतिनिधी
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्याला जेलमध्ये आहे, मात्र त्याची गॅंग बाहेर सक्रिय आहे. या कराड गँगची गुंडगिरी थांबताना दिसत नाहीये. या गँगचा आणखी एक कारनामा समोर आलाय. एका तरुणाला मारहाण करत त्याला नाक घासत माफी मागयला लावली. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवत तो व्हायरल करण्यात आलाय.
वाल्मीक कराडच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका तरुणाला कराडच्या समर्थकांनी मारहाण केलीय. इतकेच नाही तर त्याच्या घरावर हल्ला करून त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. त्यानंतर या तरुणाने त्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर वाल्मीक कराडच्या समर्थकांनी त्या तरुणाला मारहाण केली. त्याला हाथ जोडून माफी मागायला लावली. नाक घासायला लावले. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय.
राजेश नेहरकर असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. कराड समर्थकांनी त्याच्या घरावर हल्ला करत त्याच्या पत्नीला मारहाण केली. राजेश नेहरकर यांनी वाल्मीक कराडविरोधात सोशल मीडिया पोस्ट केली होती. घरावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट राजेश नेहरकर याला बोलून घेऊन वाल्मीक अण्णांच्या विरोधात काहीही करणार नाही. बोलणार नाही, अण्णांची माफी मागतो नाक घासतो पुन्हा काहीही बोलणार नाही कुठेही तक्रार करणार नाही, असा व्हिडिओ बनवून घेतला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असलेल्या जिल्हा कारागृहामध्ये एका कायद्याकडे मोबाईल सापडला होता. तो मोबाईल वाल्मीक कराड वापरत असल्याचा आरोप झाला होता. त्याच मोबाईलचा सीडीआर मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर जिल्हा कारागृहांमधील शासकीय फोनवरून देखील वाल्मीक कराड बाहेर फोन करत आहे, असा खळबळजनक दावा शिवराज बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना केला आहे.
या दोन्ही फोनचे सीडीआर मिळाले पाहिजे, यासाठी आपण स्वतः जिल्हा कारागृह निरीक्षक त्याचबरोबर अध्यक्षकांना यांना पत्राद्वारे मागणी करणार आहोत. हे दोन्ही मोबाईलचे सीडीआर समोर आले पाहिजेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.