Beed Bribe Case 
क्राईम

Beed Bribe Case: बीड जिल्ह्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार; योजनेतील विहिरीचा लाभ देण्यासाठी सरपंचानेच मागितली लाच

Beed Bribe Case: विहिरीचा लाभ देण्यासाठी सरपंचानेच लाच मागितली. याप्रकरणी सरपंचाला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

सरपंच गावाचा प्रमुख असतो. गावाचा विकास करण्यासाठी नव-नवीन विकास योजना आणण्याचं काम सरपंच करत असतो. गावातील ग्रामस्थांना सोयी-सुविधा पुरवणं, सरकारी योजनांचा लाभ देण्याचं काम त्याच्यावर असतं. गावाचा विकास हा सरपंचावर अवलंबून असतो. मात्र हाच सरपंच गावातील जिवावर उठलाय. सरकारी योजनेतील विहिरीचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंचानेच एका शेतकऱ्याकडून लाच मागितल्याची घटना घडलीय. ही संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील आडगावात घडलीय.

लाच मागणाऱ्या सरपंचाचे नाव रुख्मानंद खेत्रे आहे. सरपंच रुख्मानंद खेत्रेने विहिरीसाठी एका शेतकऱ्याकडे २० हजारांची लाच मागितली. एका शेतकऱ्याच्या आईच्या नावावर विहीर मंजूर करून देण्यासाठी सरपंचाने इंजिनिअर आणि मॅडमसाठी प्रत्येकी 10 हजारांची म्हणजे एकूण 20 हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी शेतकऱ्याने सरपंचाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गजानननगर, माजलगाव येथे सापळा रचून सरपंच खेत्रे याला लाच घेताना अटक केली.

माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील एका शेतकऱ्याने सरकारी अनुदानावर विहीर मिळावी, यासाठी आपल्या आईच्या नावे प्रस्ताव दिला होता. पण गावचे सरपंच रुख्मानंद खेत्रे यांनी विहीर मंजूर करून देण्यासाठी आणि गावच्या यादीत नाव टाकण्यासाठी लाच मागितली. विहिरीच्या मंजुरीसाठी संबंधित इंजिनिअर व मॅडम यांच्यासाठी प्रत्येकी 10 हजार रूपये असे एकूण 20 हजाराची लाच मागितली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी माजलगाव येथील गजानननगर भागात सरपंच खेत्रे यांच्या राहत्या घरी सापळा रचला. यावेळी 20 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपयांची लाच घेताना खेत्रे यांना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, समाधान कवडे, उपनिरीक्षक सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अमोल खरसाळे, संतोष राठोड आणि प्रदीप सुरवसे यांनी केली.

गावपातळीवर विकासाच्या योजनांचं लाभ देताना सरपंचच लाच मागत असेल, तर सामान्य शेतकऱ्यांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT