Beed Crime News Saam Tv
क्राईम

Beed Crime News: आणखीन पैसे दे अन्यथा तुला..; सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्यानं जीवन संपवलं, बीडमध्ये खळबळ

Beed Crime Businessman Killed Himself : एका व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळत आत्महत्या केली. संजय कांकरियानं कर्जाची सहा पट रक्कम परतफेड केली होती.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचे नाव अनुचित प्रकरणांमुळे चर्चेत येत आहे. गुन्हेगारी, मारामारी, अशा घटनांमुळे बीड जिल्हा बदनाम होतोय, तेथील वाढत्या गुन्हेगारीला वचक बसवण्यासाठी पोलीस दलात मोठे फेर बदल करण्यात आले, तरीही बीडमधील अनुचित प्रकार अजून थांबताना दिसत नाहीयेत.

कर्जपायी आणि सावकाराच्या जाचामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडत असतात. परंतु सावकाराच्या जाचामुळे चक्क एका व्यापाऱ्यानेच आपलं जीवन संपवल्याची घटना बीडमध्ये घडलीय. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्याने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले.

त्या कर्जाची सहा पटीने परतफेडी सुद्धा केली. मात्र सावकराला आणखी पैसे हवे होते. त्यामुळे सावकार व्यापाऱ्याला दमदाटी आणि धमक्या देत होता. सावकाराचा जाच सहन करण्यापलीकडे गेल्याने व्यापाऱ्यानं आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी व्यापाऱ्यानं बीडचे पोली अधीक्षक नवनीत काँवत यांना चिठ्ठी लिहिली. त्यानंतर व्यापाऱ्यानं गळफास घेतला. संजय कांकरिया, असं आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. संजय कांकरिया यांनी एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील खळबळ उडालीय.

व्यापाऱ्यानं आत्महत्या करण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. आर्थिक विवंचनेतून त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. कर्जाची सहा पट रक्कम सुद्धा त्यांनी परतफेड देखील केली. मात्र सावकारांची नजर त्यांच्या जमिनीवर होती. त्यामुळे आणखीन पैसे हवे असल्यानं सावकार कांकरिया यांच्यामागे पैसाचा तगादा लावत होता.

पैसे दिले नाही तर चटके देऊन तुझ्यासह तुझ्या कुटुंबाला जिवंत मारू, अशी धमकी दिली आणि हीच धमकी संजय कांकरिया यांना सहन झाली नाही. वाढलेला जाच पाहून कांकरिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच चिठ्ठी लिहून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

संजय कांकरिया यांनी अमृत भोसले आणि दीपक साळुंके या दोघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. कांकरिया यांनी या दोघांना सहा पट पैसे परत केले होते, तरीही यांनी पैशाचा तगादा लावला. चटके देऊन जीवे मारण्याची धमकी अमृत भोसले आणि दीपक साळुंके यांनी संजय कांकरिया यांना दिली होती. त्यानंतर संजय कांकरिया यांनी आत्महत्या घेतली.

या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले, दीपक साळुंके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आलेय. या घटनेने मोठी खळबळ उडालीये.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT