Beed Crime News Saam TV
क्राईम

Beed Crime News : ३ दिवसांचं अर्भक पोत्यात भरून रस्त्यावर फेकलं; घटनेनं परिसरात एकच खळबळ

Crime News : मांजरसुंबा- कपीलधार रोडच्या कडेला बांधून टाकलेल्या पोत्यात 3 दिवसाचं पुरूष जातीचं अर्भक आढळलंय. रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना पोतं आणि त्याच्या बाजूला कुत्रे असल्याने काहीतरी गडबड असल्याचे जाणवले.

Ruchika Jadhav

विनोद जिरे

Beed News :

बीडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा- कपीलधार रोडच्या कडेला पोत्यात 3 दिवसाचं पुरूष जातीचं अर्भक आढळलंय. रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना पोतं आणि त्याच्या बाजूला कुत्रे असल्याने काहीतरी गडबड असल्याचे जाणवले.

त्या व्यक्तीने कुत्र्याला बाजूला हुसकावून पाहिले. तेव्हा त्यांना पोत्यात एक लहान मुल दिसले. सदर व्यक्तीने आरडाओरडा केला आणि अन्य नागरिक तेथे जमा झाले. यावेळी नागरिकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी त्या चिमुकल्याला नेकनुर येथील स्त्री रुग्णालयामध्ये दाखल केले. येथे त्यावर उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान सध्या या चिमुकल्याची प्रकृती चांगली असून उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

शाळेमध्ये आढळले ४ महिन्याचे नवजात अर्भक

अकोला शहरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेत देखील ११ फेब्रुवारी रोजी अशीच एक घटना समोर आली होती. शाळेमध्ये अचानक चार नवजात अर्भक आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ६५ वर्षांवरील अन् २१ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; या जिल्ह्यातील ९८ हजार महिलांची पडताळणी होणार

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Ajit Pawar Plane Crash: दृश्यमानता ३ किमीपर्यंतची तरीही पायलटला रनवे दिसला नाही? विमान अपघाताबाबत मोठा खुलासा

Myra Vaikul: लहान वयात ट्रोलिंग नको! मायरा वायकुळच्या पालकांचा धाडसी निर्णय

SCROLL FOR NEXT