Beed Crime Saam Tv
क्राईम

Beed Crime News: लग्नाचं वचन देत लॉजवर नेलं; तरुणीवर अत्याचार करत दिली जीवे मारण्याची धमकी

Girl Assaulted In Beed:लग्नाचं प्रलोभन दाखवून 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Rohini Gudaghe

Beed Crime Girl Assaulted Lure Of Marriage

बीड (Beed) शहरात 22 वर्षीय तरुणीवर त्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 22 वर्षीय तरुणीवर लग्नाचं प्रलोभन दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेविषयी आपण सविस्तर बघू या.  (Latest Crime News)

बीड शहरात अभिषेक नावाच्या तरूणाने 22 वर्षीय पीडित तरुणीसोबत मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला लग्न करण्याचं प्रलोभन (lure of marriage) दाखवलं. त्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार (Girl Assaulted) केला. या घटनेमुळे परिसरात संतापजनक वातावरण आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला

आरोपी अभिषेकने लग्नाचे प्रलोभन दाखवून 22 वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढले. त्यानंतर तो तिला त्यानंतर कधी मित्राच्या खोलीवर तर कधी शहरातील जालना रोडवरील एका लॉजमध्ये घेऊन जायचा. तेथे तिच्यावर सतत अत्याचार करत होता. पीडिता या घटनेमुळे त्रस्त झाली होती. आरोपीचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच (Beed Crime News) होते.

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक पंजाब शिंदे रा. शिवणी, ता. जि. बीड अशी आरोपीची ओळख (Crime News) आहे.

पीडितेला जिवे मारण्याची

आरोपी अभिषेक पीडितेवर सतत अत्याचार करत होता. मात्र यादरम्यान पीडित तरूणीने लग्नाबद्दल विषय काढल्यानंतर तो तिला मारहाण करायचा. शिवीगाळ करून त्याने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली, असं 22 वर्षीय पीडितेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह (atrocity) अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला (Girl Assaulted In Beed) आहे.

लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार बीडच्या एका प्रसिध्द हॉटेल आणि लॉजवर घडला (Beed News) आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT