Thane Crime News : तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला वैतरणा नदीत; तीन आरोपींना हैद्राबादमध्ये ठोकल्या बेड्या

Thane News Update : मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत राणा राजपूत या तरुणाची हत्या करून मृतदेह वैतरणा नदीत फेकून दिला होता. या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने तपास करून तीन आरोपींना हैद्राबाद येथून ताब्यात घेतले आहे.
Thane Crime News
Thane Crime News Saam Digital
Published On

Thane Crime News

मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत राणा राजपूत या तरुणाची हत्या करून मृतदेह वैतरणा नदीत फेकून दिला होता. या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने तपास करून तीन आरोपींना हैद्राबाद येथून ताब्यात घेतले आहे. मृतदेहाच्या डाव्या हातावर गोंदवलेल्या चिन्हावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत तिन्ही आरोपींना अटक केली.

पेंटय्या जंगल्या चित्तारी (वय ३८ वर्षे, रा. इंदिरा नगर, टिटवाळा), साईकुमार इलय्या कडामाछी (वय २२ वर्षे, रा. इंदिरा नगर, टिटवाळा) व किशोर जितेंद्र शेट्ये (वय २९ वर्षे रा. मिलन नगर, कल्याण) या तिघांना अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या तिघांनी राणा राजपूत याला जीवे ठार मारून त्याला वैतरणा नदीत फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. या तिघाही आरोपींना हैद्राबाद येथून ताब्यात घेऊन मोखाडा येथे आणले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतदेहाच्या डाव्या हातावर राणा राजपूत असे गोंदवले होते. मृतदेहावर गोंदवलेल्या चिन्हावरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. दरम्यान आरोपी रेल्वे परिसरात पाणी बॉटल विकण्याचा व्यवसाय करत होते. राणा राजपूत हा तिन्ही आरोपींकडून दरमहा पैश्यांची मागणी करत होता. त्याचा काटा काढण्यासाठी या तिघांनीही राणा याला संपवल्याची कबुली तिघाही आरोपीने दिली आहे.

Thane Crime News
Atal Setu Bridge: मुंबई-पुणे एसटी बस अटल सेतूवरुन धावणार; पण 'ही'आहे अट...

मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या वैतरणा नदीच्या पुलाखाली ३ फेब्रुवारी रोजी रवी राणा याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गंभीर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व मोखाडा पोलीस ठाण्याचे तपास पथक तयार करून तपासाला सुरवात केली.

राणा राजपूत व तिन्ही आरोपी रेल्वेमध्ये पाणी विक्रीचा व्यवसाय करत होते. चारही एकमेकांचे मित्र होते. पाणी बॉटल विकण्याच्या बदल्यात राणा हा या तिघांकडून दरमहा पैशाची मागणी करीत होता व त्यांना मारहाण करत होता. ज्या दिवशी रवी राणा याला मारून टाकले. त्या दिवशीही त्याने या तिघांकडून पैशाची मागणी केली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, अनिल विभुते, प्रदीप गिते, अमोल गवळी, पोलीस उपनिरिक्षक गणपत सुळे, स्वप्नील सावंतदेसाई, पोलीस कर्मचारी दीपक राऊत, विजय ठाकुर, आदींच्या पथकांने केली.

Thane Crime News
Ajit Pawar: निमगावमधील खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा: उपमुख्यमंत्री अजित पवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com