Firing In Air Beed  Saam Tv
क्राईम

Beed Crime: हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड याच्यावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

Firing In Air: हवेत गोळीबार करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून परळीत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढत स्टंट करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कैलास फड गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. पोलीस कर्मचारी विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. परळी तालुक्यातील कनेरवाडी येथील कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता.

या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. हवेत गोळीबार करत असल्याचा कैलास फड याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. शस्त्रपूजा केल्यानंतर त्याने हवेत गोळीबार केला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे तेथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. खून, चोरी अपहरण या गुन्ह्यामुळे बीड जिल्हा कुप्रख्यात होत आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर जिल्ह्यात खळबळ उडालीय. या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलंय.

देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध असल्याचे म्हणत सामाजित कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलेत. दरम्यान कैलास फड याचा व्हिडिओ शेअर करत अंजली दमानिया यांनी बीड मधील शस्त्र परवानाधारक आकडेवारीवरून सरकारला प्रश्न केलाय.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्र परवाना देण्यात आलेत. त्यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्याकडून परवानाधारक शस्त्र वापरणाऱ्यांची यादी मागवली होती. आकडेवारी पाहून अंजली दमानिया यांनी आश्चर्य व्यक्त केलं. परवानाधारकांच्या यादीत वाल्मीक कराड याचा नावापुढे डीऍक्टिव्ह असा शेरा असल्याचं दामानिया म्हणालेत.

शस्त्र परवानाची आकडेवारी

परभणीत ३२ आहेत तर अमरावती ग्रामीण मधे २४३ शास्त्र परवाने आहेत. मग बीड मधे इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वर्धस्ताने? १२२२ अधिकृत शास्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील ? इतक्या प्रचंड प्रमाणात, शास्त्र परवाने का देण्यात आले? असा सवाल दमानिया केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT