BAREILLY SHOCKING CRIME: NEPHEW BLACKMAILS AUNT WITH VIDEO, ACCUSED OF RAPE Saam Tv
क्राईम

Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

Crime News : बरेली जिल्ह्यातील सीबीगंजमध्ये भाच्याने मावशीचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भाच्याने मावशीचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केले

  • गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप

  • व्हिडिओ दाखवून पीडितेचे लग्न मोडले

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

बरेली जिल्ह्यातील सीबीगंज परिसरातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने सख्ख्या मावशीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यानंतर महिलेचा संसार मोडल्याचे देखील उघडकीस आले आहे. या घटनेने कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी हा तिचा भाचा असून तो नेहमी तिच्या घरी येत-जात असे. या ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी मावशीचे अंघोळ करतानाचे अश्लील व्हिडिओ गुपचूप तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर दबाव टाकला.

आरोपीने एकेदिवशी पीडित महिलेच्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिला ते पिण्यास भाग पाडले. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. इतकेच नव्हे, तर या घटनेदरम्यान त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही तयार केले आणि त्यांचा वापर करून तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला. व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीमुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली आणि मानसिक त्रास सहन करत राहिली.

दरम्यान, पीडितेचे लग्न फरिदपूर येथे ठरले होते. १३ जून रोजी विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, आरोपीने फरिदपूर येथे जाऊन आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ दाखवत लग्न मोडल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पीडिता आणि तिच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, या प्रकारामुळे केवळ पीडितेची बदनामीच झाली नाही, तर तिचे वैवाहिक आयुष्य सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT