Baramati News Saam Digital
क्राईम

Baramati News: ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पोलीस पाटलाला मारहाण, 90 जणांवर गुन्हे दाखल

Baramati News: ग्राम पंचायत निवडणुकीनंतर बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडीत हाणामारी आणि शांतता भंग केल्याप्रकरणी 80 ते 90 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Baramati News

ग्राम पंचायत निवडणुकीनंतर बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडीत हाणामारी आणि शांतता भंग केल्याप्रकरणी 80 ते 90 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायंबाचीवाडी गावच्या पोलीस पाटनांनाही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी दुर्योधन भापकर याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुर्योधन भापकर याने जाणीवपूर्वक पोलीस पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

निवडणूक निकालादिवशी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी, शस्त्रबंदीचा आदेश काढला होता. मात्र, सदर आदेशाला न जुमानता सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशिररित्या गर्दी करून शांतता भंग करणे, हाणामारीचे प्रकार घडले होते. तसेच खासगी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. याबाबत पोलिसांनी स्वतः गुन्हे दाखल केले आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी 143,147,148,149,160,188,324,323,427 अंतर्गत आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 कलम 37(1)/135 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुतीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. या निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागले. बारामतीतही सायंबाचीवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात वाद झाला. या वादानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले होते. यावेळी दगडफेक, हाणामारी झाली होती. त्यानंतर वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. त्यामुळे गावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT