Solapur Crime News Saam tv
क्राईम

Badlapur Crime News: बदलापुरात तरुणावर तलवारीने वार; थरारक घटनेनं परिसरात खळबळ

Crime News: बदलापुरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर जीवघेणा हल्ला. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ruchika Jadhav

Badlapur Crime News:

बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांत गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. बदलापुरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रोहन पाठक (वय २२ वर्षे) असं जखमी तरुणाचं नाव आहे. बदलापूर पश्चिमेकडील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमकं काय घडलं?

गणेश नगर परिसरातील लकी सलून जवळ रोहन आपल्या मित्रासोबत उभा होता. त्यावेळी अचानक कारमधून सहा ते सात जण खाली उतरले. या टोळक्याने रोहनवर तलवारीने हल्ला केला. या घटनेत रोहन पाठक गंभीर जखमी झाला.

मटका जुगाराची माहिती दिल्याच्या संशयावरून एका तरुणावर हल्ला

मटका जुगाराची माहिती दिल्याच्या संशयावरून एका तरुणावर घातक शस्त्राने हल्ला झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. कॅम्प क्रमांक तीनमधील शांतीनगर परिसरात ही घटना घडलीये.

तौसिफ सय्यद असे जखमी तरुणाचे नाव आहे. मटका जुगाराची माहिती देण्याच्या संशयावरून तरुणावर वार केले गेलेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने तैसीफवर घातक शस्त्राने हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तौसिफला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आलेय. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News : दिवाळीच्या आनंदात मिठाचा खडा! फटाक्यांचा वाद टोकाला गेला, एकमेकांच्या डोक्यात फोडल्या कुंड्या

Saving Account: सेविंग अकाउंटमधील 'हे' १० व्यवहार अडचणी वाढवणार? Tax विभाग नोटीस बजावणार, प्रकरण काय?

देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे प्रथमच एकाच मंचावर! कुठे आणि कारण काय? VIDEO

व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं पायांमध्ये दिसतात; 'ही' लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update: मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई करावी विजय कुंभार यांची पंतप्रधानांकडे मागणी

SCROLL FOR NEXT