Badlapur Crime saam Tv
क्राईम

Crime: बदलापूर हादरले! मध्यरात्री रस्त्यात अडवून तरुणाची हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं

Badlapur Crime: बदलापूरमध्ये तरुणाची मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली. भररस्त्यात अडवून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले.

Priya More

मयूरेश कडव, बदलापूर

बदलापूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. वांगणीच्या कुडसावरेत धारदार शस्त्रांनी हल्ला करत तरुणाला संपवलं. भररस्त्यात तरुणावर कोयता आणि सुऱ्याने वार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्लायात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बदलापूर हादरले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर नजीकच्या वांगणी येथील कुडसावरे परिसरात एक धक्कादायक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी कोयता आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केली. गौतम जोशी असं मृत व्यक्तीचं नाव होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौतम जोशी यांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गौतम जोशी यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर, पाठीवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर ८ ते ९ वार करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच कुळगांव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. फरार हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आमदार-खासदारांचे वर्षभराचे वेतन बंद करण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपीला अटक; TMC नेत्याची पोलिसांनी काढली धिंड

Maharashtra ATS : फोर्स वन कमांडो युनिटचं नियंत्रण आता महाराष्ट्र ATS कडे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

उरणमध्ये गोदामाला भीषण आग; धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिसर हादरला, रहिवाशांना श्वसनाचा त्रास

Amitabh Bachchan Threat: अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईत २०० जण तयार असल्याचा व्हायरल पोस्टमध्ये दावा

SCROLL FOR NEXT