Scene of the assault in Sarveshwar Nagar, Sambhajinagar, where a coaching class fight escalated into brutal violence Saam Tv
क्राईम

Crime News: कोचिंग क्लासेसमध्ये मुलींमध्ये वाद पेटला, घरांपर्यंत पोहोचला, रागात आईवडिलांचं दुसऱ्या मुलीच्या पालकांसोबत धक्कादायक कृत्य

Aurangabad Parents Beat Up: औरंगाबादच्या सातारा परिसरात कोचिंग क्लासमधील वादातून एक कुटुंब घरात घुसून दुसऱ्या कुटुंबावर अमानुष मारहाण केली. या प्रकरणात पीडित महिलेच्या पायावर नाक घासायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Omkar Sonawane

कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या दोन मुलीच्या भांडणावरून एका मुलीच्या आईवडिलांनी काही लोकांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांना घरात घुसून अमानुष मारहाण आणि आईसोबत घाणेरडे वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मारहाण करणाऱ्या आरोपी आईवडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासायला लावून, माफी मागायला लावल्याचे संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील सर्वेश्वरनगर मध्ये घडला.

संदीप लंके त्याची पत्नी आणि अनोळखी दोघे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मारहाण झालेल्या संदीप श्रीधर शिंदे रा. सर्वेश्वरनगर, सातारा यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या या वादात फिर्यादी शिंदे यांच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या पाठीवर, हातावर, चेहऱ्यावर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसून येत आहेत.

संदीप शिंदे हे त्यांची पत्नी छाया व मुलींसह सर्वेश्वरनगर मध्ये राहतात. त्यांची मोठी मुलगी (वय १७) एका खाजगी शिकवणीत जाते. तेथे तिचा लंके यांच्या मुली सोबत वाद झाला. शिक्षकांनी मध्यस्थी करत, दोघींना समजावले आणि वाद मिटवला. यानंतर लंके हे शिंदेच्या दुकानावर जात तुझी मुलगी कुठे आहे, तिला समोर बोलव, तिने माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केले. असे म्हणून शिवीगाळ केली यावेळी लंके यांनी ‘माझा मोठा भाऊ पीआय’ आहे. त्याच्याशी बोलून घे त्यानंतर फोनवर बोलणे झाले. त्यानंतर ते तिथून निघून गेले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शिंदे हे घरी बसलेले असताना, संदीप लंके त्याची पत्नी आणि आणखी दोन जण हातात दांडे आणि रॉड घेऊन आले. यावेळी पुन्हा तुझी मुलगी कुठे आहे, आम्हाला तिला मारायचे आहे असे म्हणून ते ओरडत होते.

लंके यांनी हातातील दांड्याने शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सोबत असलेल्या दोघेही मारहाण करायला लागले. लंके यांची पत्नी देखील मारहाण करत होती. आरडा ओरडा ऐकून शिंदे यांची पत्नी छाया ही वरच्या मजल्यावरून खाली आली. पतीला का मारत आहेत ? असा जाब त्यांनी विचारला. यानंतर लंके यांच्या पत्नीने शिंदे यांच्या पत्नीचे केस धरून तिला मारहाण केली. यावेळी जातीवाचक शिवीगाळ देखील केली. या सर्व प्रकारात शिंदे यांची शेजारीनीने घराजवळ येऊन लंके यांना दरवाजा उघडण्यास सांगितले लंके यांनी दार उघडताच शिंदे यांच्या पत्नी छाया या त्यांच्या मैत्रिणीच्या घरी धावत सुटल्या. तिथून त्यांनी घटनेची कल्पना पोलिसांना दिली.

काही वेळाने पोलीस तेथे दाखल झाले. यावेळी देखील संदीप लंके यांनी माझा भाऊ पीआय आहे मीच मारहाण केली, असे बोलत होता. यानंतर शिंदे यांनी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. यानंतर प्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT