मुंबई : लंडनमध्ये एअर इंडियाच्या केबिन क्रू मेंबरवर हल्ला करण्यात आला आहे. काही रिपोर्ट्समध्ये केबिन क्रूवर बलात्कार झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी लंडन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत विमान कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
महिला 'केबिन क्रू'वर अत्याचार
लंडनमधील एका नामांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली. एअर इंडियाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. अहवालात असं म्हटलंय की, केबिन क्रूवर शारीरिक हल्ला करण्यात आला (Attack on air india cabin crew) होता. लंडनमधील हॉटेलमध्ये बेकायदेशीर घुसखोरीच्या घटनेवर एअर इंडियाने १७ ऑगस्ट रात्री उशिरा एक निवेदन जारी केलं होतं. निवेदनात, एअरलाइनने म्हटलंय की, ते केवळ केबिन क्रू सदस्यांनाच मदत करत नाहीत, तर पीडिता आणि तिच्या सहकाऱ्यांना या घटनेतून सावरण्यासाठी व्यावसायिक समुपदेशन देखील करत आहेत.
लंडनमध्ये घडला प्रकार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला लंडनच्या एका हॉटेलमध्ये एअर इंडियाच्या महिला केबिन क्रू सदस्यावर एका घुसखोराने हल्ला केला होता. विमान कंपनी देखील स्थानिक पोलिसांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत (air india cabin crew) आहे. महिला केबिन क्रू राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीत एक व्यक्ती घुसला आणि तिच्यावर हल्ला (Assulted) केला. तिने आरडाओरडा करताच शेजारी राहणाऱ्या इतरांनी येऊन पिडितेची सुटका केली अन् हल्लेखोर पकडला गेला.
विमान कंपनी म्हणते की...,
हॉटेलमध्ये केबिन क्रूवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप देखील केला जातोय. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार लंडन हिथ्रो विमानतळाजवळील एका स्टार हॉटेलमध्ये ही घटना (Crime News) घडली. निवेदनामध्ये एअरलाइनने म्हटलंय की, ते सहकारी आणि त्यांच्या टीमला व्यावसायिक समुपदेशनासह सर्व शक्य सहकार्य देत आहेत. एअर इंडिया स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि हॉटेल व्यवस्थापनासोबत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.