Terror Funding Case Nashik
नाशिकमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने (ATS) नाशिकमधील तिडके नगर परिसरात मोठी छापेमारी केली. या छापेमारीत आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या विदेशासह देशभरातील दहशतवाद्यांना आर्थित मदत करणाऱ्या संशयित दहशतवाद्याला (Suspected terrorists Arrested) दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय. (Latest Marathi News)
दहशतवादी विरोधी पथकाने भारतात बंदी असलेल्या दहशत संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव (ATS Raid In Nashik) आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नाशिकमध्ये दहशतवादी विरोधी पथकाची छापेमारी
हुजेफ शेखने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या सीरिया देशात राहणाऱ्या राबीया उर्फ उम ओसमा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला लाखो रुपयांची रसद भारतातून पाठवली होती, अशी माहिती (Nashik News) मिळतेय.
राज्यासह भारतभरातील दहशतवाद्यांना दहशतवादी कारवाई करण्यासाठी हुजेफ अब्दुल अजीज शेख यांने लाखो रुपयांची रसद पुरवल्याची माहिती (Terror Funding Case Nashik) मिळतेय. राज्य दहशतवादी विरोधी पथकाने छापेमारी करत शेखला ताब्यात घेवून अटक केलीय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नाशिकच्या तिडके नगर भागात ही कारवाई केली आहे.
राजधानी दिल्लीत एका दहशतवाद्याला अटक
राजधानी दिल्लीत लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला (terrorists) अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या दहशतवाद्याला दिल्ली रेल्वे स्टेशनवर अटक केली आहे. हा दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सक्रिय होता. रियाज अहमद, असं या दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती मिळतेय. त्याच्याकडून १ मोबाईल आणि २ सिम जप्त करण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांना दहशतवादी रियाज अहमद ४ फेब्रुवारी रोजी दिल्ली रेल्वे पोलीस स्टेशन येणार असल्याची माहिती मिळाली (crime news) होती. त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे एक पथक तयार केलं. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक गेटवर पोलीस तैनात केले. रियाज अहमद नवी दिल्ली स्टेशनच्या एक्झिट गेट नंबर १ वरून पळून जाणाच्या तयारीत असतानाच त्याला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.