Army jawan assaulted by toll plaza staff in Uttar Pradesh; shocking CCTV footage surfaces. saamtv
क्राईम

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Army Jawan Brutally Beaten by Toll Plaza Staff: मेरठ-कर्नाल महामार्गावर टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी एका लष्करी जवानाला बांधून क्रूरपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील मेरठ-कर्नाल महामार्गावरील भुनी टोल प्लाझा येथे संतापजनक घटना घडलीय. येथील टोल कर्मचाऱ्यांनी गुंडगिरी करत एका लष्कर जवानाला लाठ्या काठ्यांनी मारहाण केलीय. गोटका गावातील एका लष्करी जवानाला ओलीस ठेवले, त्याला खांबाला बांधले नंतर काठ्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या चुलत भावालाही टोल कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. टोल कर्मचाऱ्यांनी सैनिकाचे ओळखपत्र आणि मोबाईल फोनही हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आलीय. दरम्यान ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

दरम्यान गोटका गावातील लोकांना जवानाला मारहाण झाल्याची माहिती झाली तेव्हा त्यांनी टोल नाक्यावर धाव घेतली. गावकऱ्यांचा झुंड पाहून टोल नाक्यावरील कर्चमारी तेथून पळून गेले. गावकऱ्यांनी जवानाला आणि त्याच्या भावाला रुग्णालयात दाखल केलं. आरोपींना तात्काळ अटक करावीत अशी मागणी करत ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. पोलिसांनी चौकशी आणि कारवाईचे आश्वासन देऊन गोंधळ घालणाऱ्या लोकांना शांत केलं. दरम्यान फुटेजच्या आधारे चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती एसएसपींनी सांगितली.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला जवान हा सरूरपूरमधील गोटका गावातील रहिवासी आहे. त्याचे नाव कपिल आहे. कपिल सध्या श्रीनगरमध्ये तैनात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर रजा मिळाल्यानंतर कपिल कावड यात्रेसाठी गावात आला होता. सोमवारी त्याला श्रीनगरमध्ये ड्युटीसाठी त्याच्या बटालियनमध्ये रिपोर्ट करायचे होते. सोमवारी पहाटे ५ वाजता त्याची दिल्लीहून फ्लाईट होती. रविवारी संध्याकाळी ९ वाजताच्या सुमारास कपिल त्याचा चुलत भाऊ शिवमसोबत कारने दिल्ली विमानतळावर जात होता.

भुनी टोल प्लाझाजवळ त्याची कार आली. तेव्हा तेथे वाहनांची मोठी गर्दी होती. त्याने लवकर गर्दी मोकळी करा, असं टोल कर्मचाऱ्याला सांगितलं. त्यानंतर त्याने टोल कर्मचाऱ्यांना आपलं आयडी कार्ड दाखवत कार लवकर बाहेर काढू द्या असं सांगितलं. परंतु त्याचवेळी टोल कर्मचारी आणि त्याच्यात वाद झाला. त्यावेळी आठ ते १० टोल कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं. त्याचे ओळखपत्र आणि मोबाईल हिसकावून घेतला. कपिलला खांबाला बांधून लाठी काठीने मारहाण केली .

जवानाला बराच वेळ मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जवानाचे कपडे फटाले. लष्कर जवान आणि त्याच्या भावाला थकेपर्यंत मारहाण करण्यात आली. या दरम्यान, कोणीतरी पोलिसांना आणि गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांचा जमाव घटनास्थळी पोहोचला तेव्हा मारहाण करणारे तेथून पळून गेले.

२० लाख रुपयांचा दंड, कंत्राट रद्द

मेरठ-करनाल महामार्गावरील भुनी टोल प्लाझा येथे झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कंत्राटदार मेसर्स धरम सिंह यांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.या कंपनीला भविष्यातील सर्व करारांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आणि सध्याचा करार रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

SCROLL FOR NEXT