Beed News  Saam tv
क्राईम

Beed News : एक कोटींची रोकड, सोन्याचे बिस्किटे, दागिने; बीडमध्ये पोलिसाच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

beed crime news in marathi : बीडमध्ये व्यापाऱ्याकडे एक कोटींची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे.

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये व्यापाऱ्याकडे एक कोटींची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकली. त्यानंतर विभागाच्या पथकाला या पोलीस अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड हाती लागलं आहे.

बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्याने जिजाऊ मल्टीस्टेटच्या घोटाळ्यात एका व्यापाऱ्यास आरोपी न करण्यासाठी एक कोटीच्या लाचेची मागणी केली होती. तसेच पाच लाख रुपये खासगी व्यक्तीद्वारे स्वीकारणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्या घरावर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकत झडती घेतली होती. या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. हरिभाऊ खाडे सध्या फरार आहेत.

बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. या प्रकरणात एका व्यापाऱ्याच्या खात्यावर 60 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या सहकाऱ्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधव यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती.

बोलणी केल्यानंतर 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार 5 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना एका व्यापाऱ्यास अटक करण्यात आली. तर हरिभाऊ खाडे आणि जाधव हे फरार आहेत. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार हरिभाऊ खाडे यांच्या बीडमधील चाणक्यपुरी भागातील घराची झडती घेतली होती.

या पोलीस निरीक्षकाकडे रोख 1 कोटी 8 लाख रुपये, सोन्याची बिस्किट , दागिने असा 72 लाख रुपयांचे ऐवज आहे. तसेच 4 लाख 62 हजार रुपयांची 5.5 किलो चांदी आहे. याबरोबरच बारामती, इंदापूर येथे फ्लॅट, इंदापूर येथे व्यापारी गाळा आहे. त्याचबरोबर बारामती आणि परळी येथे प्लॉट अशी स्थावर मालमत्ता देखील आढळून आली. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्यासह सहकारी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT