Belgaum Crime News: Saam Digital
क्राईम

Belgaum News : धक्कादायक! मुलांनी बागेतील फुलं तोडली, घरमालकानं अंगणवाडी सेविकेचे नाक कापले

Belgaum Crime News: अंगणवाडीतील विद्यार्थ्याने एका व्यक्तीच्या बागेतील फुले तोडल्याच्या कारणावरुन एका अंगणवाडी सेविकेवरकेवर प्राणघातक हल्ला केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Basurte Village Crime News

बेळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यांनी बागेतील फुले तोडल्यामुळं रागाच्या भरात मालकानं अंगणवाडी सेविकेवर प्राणघातक हल्ला केला. यात तिचं नाक कापलं गेलं. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून, अधिक तपास सुरू आहे. 'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील बसुर्ते या गावात ही संतापजनक घटना घडली आहे. सोमवारी (ता.१) दुपारी अंगणवाडीतील मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडले होते. खेळता खेळता एका मुलाने शेजारील घराच्या बागेतील फुले तोडली. मुलांना फुले तोडताना घरमालकाने पाहिलं. त्यानंतर तो अंगणवाडी सेविका सुगंधा मोरे (वय ५०) यांच्याकडे गेला. फुले तोडल्यावरून त्यांना जाब विचारला.

सुगंधा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने सुंगधा यांच्या नाकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात त्यांचे नाक कापले गेले.

हल्ल्यानंतर सुगंधा यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती काकती पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनाी तात्काळ आरोपी घरमालकास अटक केली आहे.

नाराजी व्यक्त

बसुर्ते गावातील घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याच जिल्ह्यात तसेच शहर परिसरात महिलांवर अन्याय आणि अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

SCROLL FOR NEXT