Amravati News Saam TV
क्राईम

Amravati News: सलग ३ महिने महिलेवर अत्याचार; तव्यावर बसणाऱ्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Amravati Crime News: कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी पीडित महिलेला त्याने दिली होती. आपल्या पतीची तब्बेत बरोबर नसते. पतीचा आजार बरा व्हावा यासाठी पीडिता या भोंदूबाबाकडे आली होती.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News:

तवेवाला बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबा विरोधात महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी बलात्कारी बाबाला १८ दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांची पोलीस कोठडी भोंदूबाबाला सुनावण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथे ही घटना घडलीये. यामध्ये तवेवाला बाबा म्हणून नावारुपास आलेला गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने आपल्या आश्रमातच मध्यप्रदेश येथील महिलेवर तीन महीने बलात्कार केला होता.

तसेच या नराधमाने घटनेच चित्रफीत सुद्धा केली होती. कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी पीडित महिलेला त्याने दिली होती. आपल्या पतीची तब्बेत बरोबर नसते. पतीचा आजार बरा व्हावा यासाठी पीडिता या भोंदूबाबाकडे आली होती.

मात्र भोंदूबाबाने महिलेचा गैरफायदा घेतला. पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने २५ जानेवारीला कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच हा भोंदूबाबा फरार झाला होता.

पोलिसांनी भोपाळ येथील एका लॉजमधून भोंदूबाबाला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सध्या या भोंदूबाबाला अमरावतीत आणण्यात आले असून पोलिसांना आपली ओळख पटूनये यासाठी भोंदूबाबाने आपला पूर्ण लूक बदलला होता. त्याने आपली दाढी व हेअर स्टाइल बदलली होती.

दरम्यान भोंदूबाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास पोलीस करत आहेत. न्यायालयाने भोंदूबाबाला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT