Amravati Crime Saam Tvc
क्राईम

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Engineer Arrested After Mother Found Dead: अमरावतीमध्ये एका इंजिनिअर तरुणाने आईची हत्या केली. हत्येनेतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला.

Priya More
  • अमरावतीमध्ये इंजिनिअर मुलाने केली आईची हत्या

  • अमरावतीतील नवसारी रिंग रोड परिसरात घडली घटना

  • गाडगेनगर पोलिसांकडून आरोपी तरुणाला अटक

  • पुण्यातील आयटी कंपनीत हा तरुण इंजिनिअर म्हणून काम करतो

अमरावतीमध्ये इंजिनिअर तरुणाने आपल्या आईची हत्या केली. या घटनेमुळे अमरावती हादरले. आई सतत खोटं बोलत असल्याच्या रागातून मुलाने हे भयंकर कृत्य केले. तरुणाने गळा दाबून आईची हत्या केली त्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत गाडगेनगर पोलिसांनी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील नवसारी रिंग रोड परिसरातील गजानन प्लाझा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. ६५ वर्षीय आईची इंजिनिअर तरुणाने हत्या केली. रंजना सतीश कानफाडे असं मृत महिलेचं नाव असून तुषार सतीश कानफाडे असं आरोपी मुलाचं नाव आहे. आरोपी तुषार पुण्यातील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतो. तो सध्या वर्क फ्रॉम होम म्हणून घरातूनच काम करत होता.

तुषार आणि त्याची आई दोघेच घरामध्ये राहत होते. आई खोटं बोलत असल्याच्या कारणावरून त्याने तिची गळा दाबून हत्या केली असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर तुषार हा आईच्या मृतदेहाच्या बाजूलाच खुर्चीवर बसून होता. शेजारच्यांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली. आईच्या हत्येमागचे आणखी काही कारण आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

SCROLL FOR NEXT