पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने हल्ला, पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू Saam Tv
क्राईम

Crime: अंबरनाथमध्ये थरार... कामावर निघालेल्या तरुणावर कोयत्याने सपासप वार, घटना सीसीटीव्हीत कैद

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंबरनाथ पश्चिमेतील गवलदेवी परिसरात राहणाऱ्या लालमणी यादव या तरुणावर बुधवारी सकाळच्या सुमरास काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. लालमणी यादव हा आनंदनगर एमआयडीसीमधील कंपनीत कामावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडवले आणि त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हल्ल्याचे कारण काय?

होळी सणाच्या काही दिवस आधी अरविंद यादव आणि लालमणी यादव यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा राग डोक्यात ठेवून दीपक गिरी, गौतम गिरी आणि त्यांच्या दोन साथीदारांनी लालमणीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्यात लालमणी यादवला गंभीर दुखापत झली असून त्याच्या हाताला, तोंडाला, कानाला आणि दुखापत झाली आहे, त्याला तातडीने उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर लालमनी यांच्या तक्रारीवरून हल्लेखोरांविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT