Akola News  Saam Digital
क्राईम

Akola News : 24 वर्षांच्या तरुणाकडून 78 वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार; नराधमाच्या बुलढाण्यात आवळल्या मुसक्या

साम टिव्ही ब्युरो

अक्षय गवळी

अकोल्यातून अतिशय संतापजनक बातमी समोर आली होती. एका 78 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचाराची ही घटना होती. अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतशिवरात या 78 वर्षीय वृद्धेवर नातवंडाच्या वयातील युवकाकडून अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी काही दिवसांत अत्याचार करणाऱ्या युवकाला बुलडाणा जिल्ह्यातून अटक केली आहे.

राहुल अर्जुन मोरे (वय 24, राहणार. शिलोडी, बुलडाणा.) असं या आरोपीचं नाव आहे. राहुल मूळ तूप विकायचा व्यवसाय करायचा. तो तूप विक्रीसाठी अकोला जिल्ह्यात आला होता. आणि या वृद्ध महिला घरीच सोडून देतो सांगत, तिला शेत शिवारात नेत वृद्ध महिलेवर अत्याचार केला होता. भरदिवसा ही घटना घडली होती.

अकोल्यातून एका खाजगी बसनं 78 वर्षीय वृद्ध महिला दुपारच्या सुमारास दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. दाळंबी गावातच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला बसमधून खाली उतरली. येथून गावाकडं पायी जात असताना तिथे 3 जन मोटरसायकलनं आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला रस्ता लागत असलेल्या एका लिंबाच्या शेतशिवारात घेऊन गेले. आणि तिघांपैकी एका 24 वर्षाच्या व्यक्तिनं तिच्यावर बळजबरी अत्याचार केलाय. हा प्रकार कोणाला सांगितल्यास, जीवे ठार मारू, अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली. या दरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले, तिने आरडाओरड सुरू केली, आवाज कानावर पडतातच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली, हे पाहताच अत्याचार करणारा व्यक्तीने घटनास्थळावरुन पळ काढला.

त्यानंतर दोघांनी वृद्ध महिलेची सुटका करू सुखरूपपणे तिला घरी सोडलं. त्यानंतर महिलेने आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला, त्यानंतर लागलीच कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठलं. आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

विशेष म्हणजे आरोपी हा राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक झाला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु त्याचा कुठलाही सुगावा लागत नसल्यामुळे या प्रकरणात बोरगाव पोलिसांनी आरोपी संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीला 50 हजार रुपयाचा बक्षीस जाहीर केलं होतं. आज दुपारच्या सुमारास या अत्याचार करणाऱ्या राहुल मोरे याला बोरगाव मंजू पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या शिलोडी गावातून अटक केली आहे. ही कारवाई बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार, पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पीएसआय गोपाल जाधव यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

SCROLL FOR NEXT