अक्षय गवळी, साम टिव्ही
अकोला : अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली. अकोल्यातल्या बोरमळी चेलगाव येथील धरणात बुडाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. योगेश आश्रुबा डाहाळे आणि कार्तिक कृष्णा डाहाळे असं दोघे मृतकांची नावे असून दोघंही १८ वर्षाचे होते. हे दोघे मृतक अकोल्यातील चिखलगाव येथील रहिवासी. २० फुट खोल पाण्यात तळाशी असलेला मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढलं. दरम्यान, मृत योगेश आणि कार्तिक हे दोघेही धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी खाली उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
श्वास कोंडल्यानं जागीच जीव सोडला
जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली. एका २० वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. युवक आपल्या काही मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना युवकाला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचे मित्र त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, मात्र त्यांना यश आले नाही. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
मोहम्मद नदीम शेख (वय अंदाजे २० वर्षे) असे मृत तरूणाचे नाव आहे. नदीम आपल्या काही मित्रांसोबत मेहरूण तलावात गेला होता. प्राथमिक माहितीनुसार, पोहत असताना नदीमला दम लागला आणि तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी नदीमला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
तो पाण्यात बुडाला आणि त्याचा पाण्यातच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नदीमच्या कुटुंबानेही तलाव परिसरात धाव घेतली. त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढले असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर कुटुंबासह परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
येवला तालुक्यातील विसापूर गावात रविवारी दुपारच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटांत भीषण हाणामारी झाली. या झटापटीत १० जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.