Akola News Saam Tv
क्राईम

Akola News: पोलिस अधिकारीच लाचेची रक्कम घेऊन पळाला, अकोल्यातील धक्कादायक घटना

Akola Crime News: एसीबीच्या कारवाईचा संशय होताच एक पोलीस अधिकारी थेट लाचेची रक्कम घेऊन चारचाकी वाहने पसार झालाय. हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतीत घडलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय गवळी

Akola News:

एसीबीच्या कारवाईचा संशय होताच एक पोलीस अधिकारी थेट लाचेची रक्कम घेऊन चारचाकी वाहने पसार झालाय. हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतीत घडलं आहे. एका प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन आणि त्यांच्या बाजूने चार्जशीट तयार करण्यासाठी अकोट शहर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यानं तब्बल दीड लाखाची लाच मागितल्याचं हे प्रकरण आहे.

तडजोड करून लाचेची रक्कम 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत पोहचली. दरम्यान, राहुल देवकर असे या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी माहिती दिली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, अवैध सावकार प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराच्या पत्नीला तात्काळ अटकपूर्व जामीन आणि आरोपींच्या बाजूनं चार्जशीट तयार करून तपास सोपा जावा यासाठी एपीआय राहुल देवकर यांनी तब्बल तक्रारदाराला दीड लाखाची मागणी केली होती. तडजोड करून लाचेची रक्कम ही 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत आली. दरम्यान लाच देणं तक्रारदाराला मान्य नसल्यानं त्यांनी अमरावतीच्या एसीबी कार्यालयात धाव घेतली, आणि आपली तक्रार नोंदवली.  (Latest Marathi News)

या प्रकरणात सर्व पडताळणी करून लाचखोर एपीआय राहुल देवकर यांनी लाचेची मागणी केल्याच सिद्ध झालंय. त्यानुसार आज लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी राहुल देवकर हे अकोट शहरात दाखल झाले आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारली खरी. परंतु देवकर यांना एसीबीच्या कारवाईचा संशय झाला, त्यानंतर लागलीच त्यांनी लाचेची रक्कम घेत आपल्या खाजगी चारचाकी वाहनानं पळ काढला.

दरम्यान एसीपीच्या अधिकाऱ्यांनी राहुल देवकर यांचा दूरपर्यंत पाठलाग केला परंतु ते हाती लागले नाहीत. आता या प्रकरणात अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी सामशी बोलतांना दिली. या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाडी आहे. सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती एसीबीचे अधिकारी एपीआय राहुल देवकर यांच्या शोधात असून ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : वर्ध्यामध्ये शेतात संत्र्यांचा पडला सडा, ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतोनात नुकसान

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT